ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राचे‌ वितरण

19 May 2025 15:46:41
नागपूर,
Senior Citizen Identity Cards ज्येष्ठांकडे आयुष्य जगण्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. जिवन जगण्याची कलाही त्यांनी अवगत केली आहे. समाजातील ज्येष्ठ अनुभवी नागरिकांना सन्मान मिळावा याकरिता त्यांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळणे‌ आवश्यक आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र देण्यासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम) ला ६ मे २००३ च्या शासन निर्णयान्वये राज्यभरासाठी प्राधिकृत करण्यात आले, तेव्हा पासून फेस्काॅमचे हे काम अविरतपणे सुरु आहे.
 
 
Senior Citizen
 
ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासन, राज्य शासन, रेल्वे, बस, विमान प्रवास इतर विविध प्रकारच्या सवलती जाहीर करण्यात आलेल्या ठिकाणी हे ओळखपत्र ग्राह धरण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज गोळा करण्यापासून ते सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचे ओळखपत्र निर्धारित किंमत घेऊन घरपोच दिली जातात. Senior Citizen Identity Cards ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना‌ जिल्हास्तरावरील ओळखपत्र तयार करून राज्यातील १४ प्रादेशिक विभागाच्या वतीने हे कार्य सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र करिता पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग नागपूर ‌कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन फेस्काॅमचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांनी केले आहे.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0