चैतन्य– मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र

02 May 2025 18:54:04
नागपूर,
Rotary Club of Nagpur रोटरी क्लब ऑफ नागपूरतर्फे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ‘चैतन्य’ हे मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र (Mental Health Counseling Centre) सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात तणाव, चिंता, नैराश्य, आक्रमकता, व्यसनाधीनता अशा विविध मानसिक समस्या हाताळल्या जातात. तसेच सकारात्मक विचार,आत्मविश्वास,आत्मसन्मान, एकाग्रता, प्रेरणा, चांगले सामाजिक संबंध यासारख्या सकारात्मक वर्तन कौशल्यांच्या वाढीसाठीही मार्गदर्शन केले जाते.या सर्व सेवा मोफत व गोपनीय स्वरूपात दिल्या जातात आणि सर्वांसाठी उपलब्ध आहेत.‘चैतन्य’ केंद्राचे उद्घाटन १२ जानेवारी २०२५ ला फ्लोरिडा, यू.एस.ए. येथील रोटेरियन व मानसोपचारतज्ज्ञ PDG डॉ. लॅरी कुबिएक यांच्या हस्ते झाले.हे केंद्र रोटरी सेंटर, प्रोव्हिडन्स गर्ल्स हायस्कूल कॅम्पस, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आहे. कार्यदिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत खुले असते. समुपदेशन सेवा मानसशास्त्रज्ञ देविका गोखले करत आहेत.या प्रकल्पाच्या संचालिका, नागपूरच्या प्रसिद्ध वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ रीता अग्रवाल आहेत.
 
 
  
ashish
 
 -मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी "भावनात्मक समतोल" वर्कशॉप-
 चैतन्य’ समुपदेशन केंद्रात भावनात्मक समतोल या विषयावर खास कार्यशाळा मुलांसाठी ९ ते ११ मे, आणि किशोरांसाठी १६ ते १८ मे या कालावधीत, दररोज संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात येत आहे.Rotary Club of Nagpur ही कार्यशाळा मुलं व किशोरवयीन मुलांसाठी असून, यात भावनिक कला, संगीत, भूमिकाभान खेळ (role play) अशा माध्यमांचा वापर केला जाणार आहे.यामध्ये प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट व एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपीमध्ये प्रमाणपत्रप्राप्त देविका गोखले यांचे मार्गदर्शन राहणार आहे.
सौजन्य :आशिष नाईक,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0