तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Yavatmal Municipal Council यवतमाळ नगर परिषद अतिक्रमणविराेधी पथकाद्वारे बेकायदा अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वाधिक गजबजलेल्या बसस्थानक परिसरातील रस्त्याचे दुर्ता असलेले अतिक्रमण काढत या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
पूर्वकल्पना देऊनसुद्धा अतिक्रमिकांनी आपले अतिक्रमण काढले नाही, त्यामुळे पथकाने ही कारवाई केली. शुक्रवारी सकाळी मुख्याधिकारी तथा प्रशासक शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनात पाेलिस बंदाेबस्तासह नगर परिषद अतिक्रमणविराेधी पथकप्रमुख राहुल पळसकर, आराेग्य विभागप्रमुख नागेश कपाटे, अजय गुजरे, शुभम पारवे, भीम चपेरिया, तुषार चिंडाले आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. शहरातील इतर भागातही माेहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.