VIDEO: जीव वाचवण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेचा कहर, ७ जणांना चिरडले!

02 May 2025 16:45:04
बेंगळुरू,
crushed by ambulance : बेंगळुरू शहरातील विल्सन गार्डन परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने सात जणांना धडक दिली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १ मे रोजी घडली, ज्याचा व्हिडिओ आज समोर आला आहे.
 

CRASH
 
 
गाडी चालकाचा मृत्यू
 
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास, संजीवनी रुग्णवाहिकेचा चालक चिरंजीव विल्सन गार्डन पोलिस स्टेशन परिसरातील बीटीएस रोडवर वेगाने आणि बेपर्वाईने रुग्णवाहिका चालवत होता. यादरम्यान, रुग्णवाहिकेने दोन गाड्या, एक ऑटो, एक स्कूटर आणि एका पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात ४९ वर्षीय गाडीचालक रमेश याचा मृत्यू झाला आणि इतर ६ जण जखमी झाले.
 
ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला - चालक
 
 
 
 
 
 
घटनेनंतर तिथे लोकांची गर्दी जमली आणि त्यांनी रुग्णवाहिका चालक चिरंजीवला पकडले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लोकांनी रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण केली होती. यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ड्रायव्हरला गर्दीतून बाहेर काढले आणि नंतर त्याला पोलिस ठाण्यात आणले. सध्या या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
चौकशीदरम्यान, चिरंजीवने सांगितले की, रुग्णवाहिकेचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0