फेस्काॅमने घेतली डॉ.राज गजभिये यांची भेट

20 May 2025 19:05:16
नागपूर,
FESCOM Nagpur महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम) पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग नागपूरच्या वतीने ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक उपलब्ध सेवा संबंधी माहिती घेण्यासाठी प्रादेशिक सचिव, डॉ. दीपक शेंडेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांची भेट घेतली.यावेळी ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा सुविधा बाबतीत चर्चा करण्यात आली. डॉ. गजभिये यांनी सांगितले की, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली असून, त्या ठिकाणी ज्येष्ठांची‌ सर्व प्रकारची‌ तपासणी व औषधी मोफत दिली जातात.
 
 

shende 
 
 
ज्येष्ठ नागरिक आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मेडीकल कॉलेज परिसरात सकाळी योगा करतात व परिसरात फेरफटका मारतात. सध्या या परिसरात सकाळी योगा व फिरायला मनाई केली आहे. यावर त्यांनी सांगितले की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.FESCOM Nagpur  सर्वाच्या आग्रहावरुन काही तोडगा काढणे शक्य असेल तर त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे डॉ. गजभिये म्हणाले. याप्रसंगी पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागाचे सुधीर सालफळे, मुरलीधर कुंभलकर, आयस्काॅनचे बबन वानखडे, कॅप्टन प्रभाकर विंचूरकर, डॉ. चंद्रनाथ भागवतकर, विनोद विंचूरकर, मधुकर वानखेडे, बापुराव गगविर, वा.रा. मेश्राम, रामभाऊ भोसकर, विलास शेकोकर, राजेश गायकवाड, गुलाबराव जुनघरे, दिलीप हटवार, मंजुषा वासनिक, संगीता कोल्हे व इतर अनेक नागरिक ‌परिसरातील उपस्थित होते.
सौजन्य:डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0