कल्याण: चार मजली इमारत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू!

मृतांमध्ये दीड वर्षीय चिमुरडीचा समावेश

    दिनांक :20-May-2025
Total Views |
कल्याण,
Kalyan-Building Collapsed : कल्याण पूर्वमधील चिकणी पाडा परिसरात चार मजली इमारत कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा समावेश असल्याचं समोर येत आहे. तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने ही घटना घडली. या ठिकाणी महापालिकेचे बचावपथक पोहोचले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी सापडले आहे का याचा शोध सुरू आहे.
 

Kalyan-Building Collapsed
 
 
 
कल्याण पूर्व मंगलराघो नगर परिसरातील सप्तशृंगी या इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या चार मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू होते. त्यावेळी त्याचा स्लॅब कोसळला. तो थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
 
सहा जणांचा मृत्यू
 
 
इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर त्या ठिकाणी अग्निशनम दल, महापालिकेचे पथक पोहोचले. सुरुवातीला आठ जणांना या ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. इतर दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
अजूनही काहीजण अडकल्याची भीती
 
 
तिसऱ्या मजल्यावर काम सुरू असताना या इमारतीमध्ये अनेकजण होते अशी माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर घरांमध्ये नातेवाईकही आल्याची माहिती समोर येत आहे.
 
 
मृतांची नावे
प्रमिला साहू (58)
नामस्वी शेलार (1.5)
सुनीता साहू ( 37)
सुजाता पाडी (32)
सुशीला गुजर (78)
व्यंकट चव्हाण (42)
घायलों के नाम
अरुणा रोहिदास गिरणारायन (48)
शरवील श्रीकांत शेलार (04)
विनायक मनोज पाधी (45)
यश क्षीरसागर (13)
निखिल खरात (27)
श्रद्धा साहू (14)
 
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्या इमारतीचे नाव सप्तशृंगी आहे जे खूप जुने आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.