गिरड,
Shedgaon flyover नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव उड्डाणपुलाच्या समोरील नाल्यावरील पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीने दुसर्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार रितेश उर्फ सन्नी उईके रा. दहेगाव याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार २० रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास झाला.
रितेश उईके हा एम. एच. ३२- ए.बी. ६२३८ क्रमांकाच्या दुचाकीने दहेगावकडून जामकडे जात होता. शेडगाव शिवारात एम. एच.३२-एपी ५७७४ क्रमांकाच्या दुचाकी चालकाची रितेशच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याच्या डोयाला जबर मार लागल्याने महामार्ग पोलिसांच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी समुद्रपूर येथे नेले. Shedgaon flyover परंतु, डॉटरांनी तपासून मृत घोषित केले. तुषार इरपाते याच्या तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार रवींद्र रेवतकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, अनिल वाघमारे करीत आहे.