'मन में आया बक दिया' म्हणे ऑपरेशन सिंदूर हे छोटं युद्ध

21 May 2025 12:45:50
नवी दिल्ली
Mallikarjun Kharge भारताने अलीकडेच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. खडगेनी या कारवाईस “छोटं युद्ध” असे संबोधल्यामुळे भाजपसह इतर राष्ट्रवादी पक्षांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.
 
 
 
Mallikarjun Kharge
खडगे Mallikarjun Kharge म्हणाले, “ही कारवाई पूर्ण युद्ध नव्हती, तर एक मर्यादित स्वरूपाचं लष्करी अभियान होतं. त्यामुळे याला छोटं युद्धच म्हणावं लागेल.” मात्र, या वक्तव्याचे अनेकांनी संपूर्ण वेगळे अर्थ काढत त्यांच्यावर लष्कराच्या शौर्याचा अवमान केल्याचा आरोप केला आहेभाजपचे नेते म्हणाले की, अशा संवेदनशील वेळी लष्करी कारवाईचं अवमूल्यन करणं हे अत्यंत गैरजबाबदारपणाचं लक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने शौर्य दाखवले असताना विरोधक मात्र देशाच्या मनोबलावर पाणी फेरत आहेत, अशी टीका भाजपकडून करण्यात आली.
 
 
दरम्यान, काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण देत सांगितले की, खरगेंच्या वक्तव्याचा उद्देश लष्कराचा अपमान करण्याचा नव्हता. त्यांनी फक्त परिस्थितीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं असल्याचं काँग्रेसचे नेते म्हणाले.या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून ‘देशहित आणि लष्कराच्या सन्मानाबाबत राजकीय पक्षांनी एकवाक्यता बाळगावी’ अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0