सिद्धांत चतुर्वेदी सारा तेंडुलकर यांचा ब्रेकअप

सोशल मिडियावर चर्चा रंगली

    दिनांक :21-May-2025
Total Views |
मुंबई,
Sara Tendulkar अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच्यातील नातं काही काळापूर्वी चर्चेत आले होते. दोघांनी एकत्र वेळ घालवला, एकमेकांच्या कुटुंबांना ओळख करून दिली, मात्र आता त्यांच्या नात्याचा शेवट झाल्याची बातमी समोर आली आहे.
 
 

Siddhant Chaturvedi Sara Tendulkar breakup 
सिद्धांत चतुर्वेदी यांनी स्वतःच सारा तेंडुलकरसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, ब्रेकअप अलीकडेच झाला असून, कुटुंबीयांची भेट आणि चर्चा यानंतर हा निर्णय झाला. "दोघांनीही हे नाते गंभीरपणे सुरू केले होते, पण कुटुंबांच्या ओळखीमुळे त्यांचा संबंध तुटला," अशी चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.
 
ब्रेकअपमागील Sara Tendulkar खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. याआधी साऱ्याचे नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडले गेले होते, पण शुभमनने ती अफवा असल्याचे नाकारले आहे. तो सध्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असून कोणालाही डेट करत नाही, असे स्पष्ट केले आहे.दरम्यान, सिद्धांत चतुर्वेदी यांचे नाव गेल्या वर्षी नव्या नवेली नंदा या अभिनेत्रीशी जोडले गेले होते. मात्र, त्यांचा देखील ब्रेकअप झाल्याची माहिती आहे.कामाच्या बाबतीत, सिद्धांतने 'गली बॉय' चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती, ज्यामुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्याने ‘बंटी और बबली 2’, ‘गहराइयां’, ‘फोन भूत’, ‘खो गए हम कहाँ’ आणि ‘युद्ध’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो ‘धड़क 2’ आणि ‘दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग’मध्ये दिसणार आहे.