देखते रह जाओगे...तुम्ही पाहिलंत का सूर्याचं खळं ?

Solar halo-Nagpur सूर्याभोवती कधी आणि का येतं?

    दिनांक :21-May-2025
Total Views |
नागपूर, 
 
Solar halo-Nagpur आज नागपूरकर आणि भारतातील इतर काही राज्यांचे नागरिक एका नेत्रसुखद आणि चकीत करणाऱ्या खगोलीय घटनेचे साक्षीदार झालेत. भर मे महिन्यातील तळपत्या सूर्याला गोलाकर आणि इंद्रधनुषी 'वलय' (celestial ring of light) आल्याचा अनुभव आज उपराजधानीसह विदर्भातील अनेक जणांनी घेतला. नागरिकांनी  या अद्भुत खगोलीय घटनेचे  फोटो काढून सोशल मिडीयावर शेअर केले. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना निसर्गानेही श्रद्धांजली अर्पण केली असल्याची भावूक प्रतिक्रियाही काही जणांनी व्यक्त केली. सूर्याभोवती हे वलय किंवा खळं म्हणजे नेमकं काय ? जाणून घेऊ या ! 
 
 

Solar halo-Nagpur 
 (आमच्या वाचकांनी पाठविलेले हे छायाचित्र)
 
Solar halo-Nagpur सूर्याभोवती येणाऱ्या वर्तुळाकार इंद्रधनुषी तेजस्वी कड्याला खळे म्हणतात. क्षितिजावर दिसत असलेले हे अर्धे दिसते मात्र सूर्य डोक्यावर असताना ते पूर्ण इंद्रधनुष दिसते. हे पूर्ण इंद्रधनुष्य या खळ्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती अंदाजे २२° त्रिज्येचे वर्तुळाकार कडे दिसते, जे आकाशातील हिमकणांमुळे तयार होते. हिमकणावर सूर्याची किरणे विकेंद्रित, परावर्तित होऊन हे खळे दिसते.
 
 
सूर्याभोवती हे वलय कधी आणि का येतं?
Solar halo-Nagpur सूर्याभोवती या वलय येण्याच्या प्रक्रियेस मराठीत सूर्याभोवतीचे प्रभामंडळ असे म्हणतात. बुधवारी हे सूर्याभोवतीचे वलय पहायला मिळाले. ही एक साधरण खगोलीय घटना आहे ज्याला भौगोलिक भाषेत 'सोलार हेलो' म्हटले जाते. जेव्हा सूर्य पृथ्वीच्या 22 अंशात असतो, त्यावेळी आकाशात 20 हजार फुटांवर सिरस क्लाऊडमुळे (आर्द्रता असलेले असे ढग ज्यांचा थर अतिशय पातळ असतो) हे गोलाकार कडं बनतं. बऱ्याचदा या वलयात इंद्रधनुष्याचे सप्तरंग देखील आढळून येतात. सूर्य किंवा चंद्राची किरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन हे वलय तयार होते, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
 
 
Solar halo-Nagpur सूर्याचे किरण आकाशातील हिमकणांवर पडतात, तेव्हा ते वाकतात आणि त्यांच्यामुळे सूर्याभोवती खळे दिसतात असे म्हणता येईल. २२° च्या खळ्याव्यतिरिक्त, इतर प्रकारचे खळे देखील दिसू शकतात, जे आकाशातील हिमकणांच्या आकारावर अवलंबून असतात. खळे आणि हवामान : खळे येणे हे काही विशिष्ट हवामानाचे संकेत असू शकतात, जसे की गारपटीची शक्यता किंवा थंड हवामान! खळ्यांचे महत्त्व हेच की खळे हे निसर्गाचे एक अद्भुत आणि सुंदर दृश्य आहे, जे अनेकजणांना आकर्षित करते, असंही ते म्हणाले.