नागपूर,
‘फिजा मे घुल गई हैं मेहेक अद्रक की
आज सर्दी भी चाय की तलफगार बन गई
जरा नखरे ताे देखीए चाय पत्ती के
दूध से क्या मिली शर्म से लाल हाे गई...’
हा शेर आहे Tea Day प्रसिद्ध शेफ विष्णू मनाेहर यांचा. ते खाद्यपदार्थ उत्तम तयार करतातच. अख्खा महाराष्ट्रच नाही देशात आणि जागतिक स्तरावर त्यांची शेफ म्हणून ओळख आहे. पण त्यांचा हा शेर ऐकल्यावर त्यांच्या चहावरील प्रेमाची प्रचीती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आंतरराष्ट्रीय चहा दिवसाचे निमित्त साधून त्यांच्याशी खास संवाद साधला असता चहाचे किस्से, प्रकार आणि विविध आठवणी त्यांनी सांगितल्या.
विष्णू मनाेहर Tea Day स्वतःच्या चहाच्या सवयीबद्दल सांगतात की सामान्य मराठी कुटुंबाप्रमाणे मी सकाळी 2 ते 3 वेळा चहा पिताे. पण ताे ताज्या दुधाचा आणि त्यावर फेस आलेला असावा हा माझा आग्रह असताे. ते सांगतात, कामाच्या निमित्ताने बाय राेड अनेक ठिकाणी जाणे व्हायचे. आल्याचा चहा पिण्याची सवय. पण ढाबा, हाॅटेलमध्ये आल्याचा चहा मिळेलच असे नाही. त्यामुळे आम्ही आले साेबत ठेवायचाे आणि आमच्याकडे असलेल्या चहाच्या मशीनमध्ये काही सुधारणा करून आल्याचा चहा पाहिजे तेव्हा मिळण्याची साेय करून घेतल्याची आठवण ते सांगतात.
चिमूटभर तिखट टाकायचं, पण सांगायचं नाही
कुठेही गेला तरी वैदर्भाय माणूस फर्मावताे, ‘अद्रक की तिखी चाय पिलाओ’. यासाठी विष्णू मनाेहर यांनी स्वतःची एक रेसिपी विकसित केली आहे. ते सांगतात, तीन ते चार जणांचा आल्याचा चहा बनविताना मी त्यात चिमूटभर मीठ टाकताे. यामुळे चहाला फेसाळपणा येताे आणि त्यात अगदी चिमूटभर तिखट टाकायचं पण कुणाला सांगायचं नाही. हे पाेटात गेल्यावर प्रत्येकाला ‘अद्रक की तिखी चाय’ पिल्याचा आनंद नक्कीच येताे, असे मनाेहर अनुभवातून सांगतात.
आणि मी खराब चहा बनवायला लागलाे
मनाेहर सांगतात, मी चाैथीत असताना आईने मला चहा बनवायला शिकवलं. पदार्थ बनविणे ही आवड असल्याने मीदेखील अतिशय परिश्रमाने चहा बनवायला लागलाे आणि त्यात तरबेज झालाे. माझ्या हातचा चहा सुंदर बनायला लागला आणि सकाळचा चहा बनविण्याची जबाबदारी माझ्यावरच थाेपली गेली. हे भलतं हाेऊन बसल्यामुळे मी मग खराब चहा बनवायला लागलाे आणि या चहा बनविण्याच्या कामातून माझी सुटका झाली.
चहा दिवसाचे औचित्य काय?
भारताच्या शिारसीवरून संयुक्त राष्ट्राने 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस घाेषित केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील चहाच्या याेगदानासाठी लाेकांना जागरूक करण्यासाठी भारताने मिलान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बैठकीत हा प्रस्ताव मांडला. त्यानुसार संयुक्त राष्ट्राने त्यांचे सदस्य असलेले सर्व देश, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. जगातील दुसèया क्रमांकाचा चहा उत्पादक देश असलेल्या भारताचे उत्पादन 2027 पर्यंत 16.1 दशलक्ष टन हाेण्याचा अंदाज आहे.