आर्णीत काँग्रेसची आगामी निवडणुकासंदर्भात बैठक

22 May 2025 14:46:42
तभा वृत्तसेवा आर्णी,
Congress आर्णी नगर परिषद क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आर्णी येथील धुमाजी नाईक मंगल कार्यालय येथे रविवारी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर अपेक्षित असलेल्या नगर परिषद निवडणुकींच्या पृष्ठभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक तालुका व शहर काँग्रेस कमेटी द्वारा आयोजित करण्यात आली होती.
 

Congress  
बैठकीच्या Congress  अध्यक्षस्थानी शिवाजी मोघे होते. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहून बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महत्वाच्या सूचना केल्या. येथून पुढे निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
जितेंद्र मोघे, आरीज बेग मिर्झा, डॉ. रामचरण चव्हाण, राजू गावंडे, देवानंद चांदेकर, राहुल मानकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमेटी, वार्ड कमेटी नियुक्त्या करण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. वार्ड निशिती व आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होईल तसेच उमेदवारी, आघाडी याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. संचालन शहराध्यक्ष अमोल मांगुळकर व तुळशीदास मोरकर यांनी, तर आभारप्रदर्शन छोटू देशमुख यांनी केले.
या बैठकीला तालुकाध्यक्ष सुनील भारती, माजी पंस सभापती राजू वीरखेडे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष कादर इसाणी, उमेश कोठारी, नरेश राठोड, नंदकिशोर राठी, अतुल देशमुख, यासीन नागानी, गफूर शाह, संजय ठाकरे, नाना बंगळे, प्रकाश अंदुरे, जाकिर सोलंकी, अतुल मुनगिनवार, खुशाल ठाकरे, शेख जाफर पेंटर उपस्थित होते.
काँग्रेसचे Congress नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ लवकरच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून आर्णी तालुक्यात शेतकèयांच्या प्रश्नांवर पदयात्रा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पदयात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. लवकरच पक्षातर्फे प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातील शेतकरी पदयात्रा व सभेची तारीख, स्वरूप इत्यादीबाबत माहिती जाहीर करण्यात येणार असून सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0