वणी नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्याची प्रगती

22 May 2025 19:24:09
तभा वृत्तसेवा वणी,
Shyam Mude येथील नगर परिषद शाळा क्रमांक 1 मधून प्राथमिक शिक्षण घेतलेला विद्यार्थी डॉ. श्याम नारायण मुडे हे देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी विराजमान झाले आहे. ते याच महाविद्यालयात भूशास्त्र (ॠशेश्रेसू) विषयाचे प्रोफेसर व विभागप्रमुख आहेत. नगर परिषद शाळेत शिकलेला वणीचा एक सुपुत्र पुण्याच्या नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी पोहोचल्याने त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

Dr. Shyam Mude is the new principal of Ferguson College. 
डॉ. श्याम मुडे हे वणी येथे जैन स्थानकासमोर राहत होते. त्यांचे वडील नारायण मुडे हे नायब तहसीलदार होते. श्याम यांनी प्राथमिक शिक्षण वणी नगर पालिकेच्या शाळा क्रमांक 1 मधून पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण वणीच्याच जनता विद्यालयातून पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी 11 वी साठी लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून 12 वी केल्यानंतर त्यांनी वेगळी वाट निवडली. त्यांना बालपणापासूनच जमीन, भूगर्भ याविषयी कुतूहल व आवड होती. त्यामुळे त्यांनी भूशास्त्र हा विषय निवडून पुढील शिक्षणासाठी बल्लारपूर निवडलं. 1999 मध्ये बल्लारपूरच्या गुरुनानक महाविद्यालयात भूशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 2001 मध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी याच विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केली. दरम्यान ते सेटची परीक्षादेखील उत्तीर्ण झाले.सुरवातीच्या काळात डॉ. श्याम मुडे यांनी नागपूर विद्यापीठानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज येथे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम केले. 2006 मध्ये ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘असिस्टन्ट प्रोफेसर’ म्हणून रुजू झालेत. पुढे त्यांचा हा प्रवास असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर पदापर्यंत पोहोचला. त्यानंतर ते याच महाविद्यालयातील जिऑलॉजी विभागाचे विभागप्रमुख झाले. आता त्यांचा प्रवास याच कॉलेजमध्ये प्राचार्यपदापर्यंत पोहोचला आहे.
Powered By Sangraha 9.0