तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Mahasagar Excellence Award पनवेल प्रेस क्लब यांच्या विद्यमाने नुकताच पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महासागर एक्सलन्स अवॉर्ड 2025 च आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान यवतमाळ येथील डॉ. रजनी कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून सर्व स्तरांतून नामांकन आले होते. त्यामधूनच मोजक्या प्रतिष्ठित आणि उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या सोहळ्यासाठी चित्रपट अभिनेत्री दीपाली सय्यद, माजी खासदार तथा लोकनेते राम ठाकूर, संपादक श्रीकृष्ण चांडक, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, बेटी बचावचे महाराष्ट्र प्रमुख प्रणेते डॉ. गणेश राख, पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक अॅड. प्रथमेश सोमण, प्रा. जयंत महाजन, जेजे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘स्वप्न मोठं असावं, पण ते साकार करण्याचं धैर्यही तितकंच मोठं असावं’ ही ओळ डॉ. रजनी कांबळे यांच्यावर अगदी फिट बसते. सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेल्या रजनी यांना बालपणापासूनच डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती. वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी वेगळं, माणसांच्या वेदनांवर फक्त औषधोपचार नव्हे तर ममत्वाने, आपुलकीने त्या वेदना दूर कराव्यात अशी त्यांची धारणा होती. त्यांनी एमबीबीएस, एमएस करून स्वतःला एक उत्कृष्ट स्त्रीरोग तज्ञ म्हणून सिद्ध केलं.
यवतमाळच्या Mahasagar Excellence Award मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संचालक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी शिक्षणक्षेत्रातही भर घातली. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करून हजारो विद्यार्थ्यांना घडवलं. त्यातून त्यांची सामाजिक बांधीलकी अधिक उठून दिसते.ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे, किशोरवयीन मुलींसाठी हेल्थ वर्कशॉप्स, ‘बेटी बचाओ’ रॅली, अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी स्त्री-आरोग्याच्या संवेदनशील विषयांना वाचा फोडली आहे.
पुरस्कारांचा पाऊस
डॉ. रजनी कांबळे यांना स्त्रीरोग तज्ञ संघटनेचे चार राष्ट्रीय पुरस्कार, रोटरी ट्रॉफी, साधना देसाई ट्रॉफी अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. या साèया प्रवासामागे त्यांचे आई-वडिल व्यंकट व यशोदा बनसोड यांचे मार्गदर्शन, पती डॉ. सुदर्शन यांचे बळ, सासु-सासरे अनंत व गोदावरी कांबळे आणि मुलांचं सहकार्य ही बलस्थाने आहेत.