रत्नागिरी,
Mango Sheera recipe उन्हाळ्यात आंबा हा सर्वांचाच आवडता फळांचा राजा! त्याच हापूस आंब्याच्या चविष्ट स्वादाला वेगळीच उंची देणारा पारंपरिक आणि गोड प्रकार म्हणजे आंब्याचा शिरा. सध्या आंब्याचा हंगाम जोमात असून घराघरात विविध आंब्याच्या रेसिपीज बनवल्या जात आहेत. त्यात आंब्याचा शिरा ही एक खास आणि वेगळी चव देणारी डिश ठरत आहे.
रेसिपी : आंब्याचा शिरा
साहित्य :
रवा – १ वाटी
साजूक तूप – ४ चमचे
आंब्याचा रस (हापूस) – १ वाटी
साखर – अर्धी ते तीन चौथाई वाटी (चवीनुसार)
दूध – अर्धी वाटी
पाणी – अर्धी वाटी
वेलदोडा पूड – अर्धा चमचा
काजू-बदाम – सजावटीसाठी
कृती :
१. प्रथम Mango Sheera recipe एका कढईत तूप गरम करून त्यात रवा हलवून खरपूस भाजून घ्या.
२. दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात दूध, पाणी व साखर एकत्र करून उकळा.
३. रवा भाजून झाल्यावर त्यात उकळलेले दूध-पाणी मिश्रण सावकाश घाला आणि सतत ढवळत राहा.
४. रवा शिजल्यावर त्यात आंब्याचा रस घालून मिक्स करा.
५. मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा.
६. शेवटी वेलदोडा पूड आणि साजूक तुपात तळलेले काजू-बदाम घालून सजवा.
टीप :
आंब्याचा शिरा गरम किंवा थंड करून दोन्ही प्रकारे खाल्ला जाऊ शकतो.
हापूस आंबा असल्यास स्वाद अधिक खुलतो.
सण, व्रत किंवा खास संधी निमित्त आंब्याच्या रसातून तयार होणारा हा शिरा नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरणारा आहे.