मुंबई,
Coronavirus राज्यात कोविड-१९ संसर्गाची स्थिती गंभीर नसली तरी चिंता वाढवणारी आहे. सर्वेक्षणाच्या माहिती नुसार महाराष्ट्रातील २२ टक्के कुटुंबांमध्ये एका किंवा अधिक सदस्यांना कोविड, फ्लू किंवा विषाणूजन्य तापाची लक्षणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, १५ टक्के कुटुंबांमध्ये दोन किंवा अधिक सदस्यांना अशी लक्षणे जाणवली आहेत.
आरोग्य विभागाची माहिती
आरोग्य Coronavirus विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२२ मे) राज्यात २६ नवीन कोविड-१९ रुग्ण आढळले असून, २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण १३२ रुग्णांची नोंद झाली आहे. याच काळात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. हे दोघे रुग्ण आधीपासूनच गंभीर आजारांनी त्रस्त होते. मृतांपैकी एकाला मूत्रपिंडाच्या आजारांसह हायपोकॅल्सेमिया होता, तर दुसरा रुग्ण कर्करोगाने ग्रस्त होता.राज्यात जानेवारीपासून ६,०६६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून, त्यापैकी १०६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी १०१ रुग्ण मुंबईतील, तर उर्वरित पुणे, ठाणे आणि कोल्हापूरमधील आहेत. सध्या १६ रुग्णालयांत ५२ सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी आवश्यक
सर्वेक्षण Coronavirus अहवालात सुचवण्यात आले आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्षणे असलेल्या, विशेषतः इतर गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिकांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असा सल्ला द्यावा. या गटातील व्यक्ती संसर्गाच्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहेत.लोकल सर्कलच्या मागील सर्वेक्षणानुसार, २०२४ मध्ये विषाणूजन्य लक्षणे असलेल्या २० पैकी केवळ एका व्यक्तीचीच कोविड चाचणी झाली होती. त्यामुळे सध्या आढळणाऱ्या रुग्णांची आकडेवारी ही प्रत्यक्ष संख्येपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
२७ जिल्ह्यांतील ७ हजार नागरिकांचा सहभाग
महाराष्ट्रात Coronavirus कोविड रुग्णसंख्या सध्या १००च्या खाली असली, तरी हा आकडा लक्षणांची गांभीर्यता, चाचण्यांची संख्या आणि सरकारी आकडेवारीच्या मर्यादा लक्षात घेऊन पाहण्याची गरज आहे. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर हंगामी फ्लूसारखे उपचार दिले जात आहेत.या सर्वेक्षणात राज्यातील २७ जिल्ह्यांतील ७ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. यापैकी ५४ टक्के प्रतिसादकर्ते मुंबई आणि पुण्यातील होते. सहभागींपैकी ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिला होत्या.