नवी दिल्ली,
Job Fair 2025 बेरोजगार तरुणांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली सरकारकडून मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. येत्या जुलै महिन्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठीची तयारी सुरु झाली आहे.
दिल्लीचे Job Fair 2025 कामगार आणि रोजगार मंत्री कपिल मिश्रा यांनी यासंदर्भात रोजगार संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रभावी रणनीती तयार करण्यात आली असून, विविध विभाग आणि औद्योगिक संघटनांशी समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कपिल मिश्रा यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात रोजगार मेळाव्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून दिल्लीतील बेरोजगार तरुण आणि रोजगार देणाऱ्या संस्था यांच्यासाठी एक सामायिक व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. दोघांनाही थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे.
रोजगार मेळा यशस्वी करण्यासाठी FICCI, CII, PHD चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासह प्रशिक्षण आणि तंत्रशिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, तसेच दिल्ली कौशल्य व उद्योजकता विद्यापीठाची मदत घेतली जाणार आहे.याशिवाय, GGIPU अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालये, संस्था, हॉटेल्स, रुग्णालये यांना पत्रे आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येणार आहे, जेणेकरून इच्छुक उमेदवार व रोजगार देणाऱ्या संस्थांचा डेटा गोळा करता येईल.
निर्देश जारी
प्लेसमेंट व Job Fair 2025 नोकरी देणाऱ्या कंपन्यांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश कामगारमंत्र्यांनी दिले आहेत. यामध्ये तांत्रिक संस्था, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संस्था यांचा समावेश असेल.पुढील आठवड्यात या रोजगार मेळ्याच्या आयोजनासाठी आणखी एक बैठक होणार असून, त्यामध्ये ठिकाण, सहभागी संस्थांची संख्या, आमंत्रण प्रक्रिया, नियुक्त्यांची शक्यता आणि सहभागी उमेदवारांची संख्या यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.