विंग कमांडर व्योमिका सिंग सारखे बनायचे आहे?

23 May 2025 15:08:55
नवी दिल्ली,
Indian Air Force भारतीय हवाई दलाच्या शूर महिला अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अलिकडेच त्यांनी आर्मी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासह 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमुळे संपूर्ण देशाचे लक्ष या दोन महिला अधिकाऱ्यांकडे वेधले गेले.
 
 
Indian Air Force
व्योमिका Indian Air Force सिंग यांनी २००४ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मार्फत हवाई दलाच्या फ्लाइंग शाखेत प्रवेश घेतला होता. आज त्या एक कुशल हेलिकॉप्टर पायलट म्हणून देशसेवेत कार्यरत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हवाई दलात दाखल होण्याचा निर्णय घेतला. एनसीसीमध्ये कॅडेट असताना त्यांनी देशसेवेचा मार्ग निवडला होता.
 
 
हवाई दलात पायलट होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी अनेक मार्ग उपलब्ध
 
 
१. एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी)
१२ वी Indian Air Force (पीसीएम) उत्तीर्ण विद्यार्थी एनडीएच्या माध्यमातून थेट हवाई दलात प्रवेश करू शकतात. आता मुलींनाही एनडीएद्वारे संधी उपलब्ध आहे. उमेदवाराचे वय १६.५ ते १९.५ वर्षांदरम्यान असावे.
 
 

२. AFCAT (एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट)
अविवाहित पुरुष आणि महिलांसाठी ही परीक्षा असते. फ्लाइंग शाखेसाठी वय २० ते २४ वर्षे असावे. १२ वीमध्ये PCM मध्ये किमान ५०% आणि पदवीमध्ये ६०% गुण आवश्यक. तांत्रिक शाखेसाठी बी.टेक आवश्यक. यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळते.
 
 
३. सीडीएस (संयुक्त संरक्षण सेवा)
ही परीक्षा देखील हवाई दलात अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी घेतली जाते. उमेदवाराने १२ वीमध्ये PCM घेतलेले असावे व कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
 
४. एनसीसी स्पेशल एंट्री
ज्यांच्याकडे एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र आहे आणि जे बी.टेकच्या अंतिम वर्षात आहेत किंवा पदवी पूर्ण केली आहे, त्यांना लेखी परीक्षा न देता थेट AFSB मुलाखतीद्वारे फ्लाइंग ब्रांचमध्ये प्रवेश मिळू शकतो.
व्योमिका सिंग यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्यासारखे आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हवाई दलातील संधींचा लाभ घेणे हे पहिले पाऊल ठरू शकते.
Powered By Sangraha 9.0