सलमाननेच बोलावलं' – ईशा छाब्रियाचा खळबळजनक खुलासा

23 May 2025 13:17:48
मुंबई,
Salman Khan बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ३६ वर्षीय मॉडेल ईशा छाब्रिया आणि २३ वर्षीय युवक जितेंद्र कुमार सिंह यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ईशा छाब्रियाने केलेल्या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 

Salman Khan house intrusion Esha Chhabria arrested 
२१ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजता ईशा छाब्रियाने सलमान खानच्या निवासस्थानी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ईशाने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात म्हटलंय की, “सलमाननेच मला घरी बोलावलं होतं. आम्ही सहा महिन्यांपूर्वी एका पार्टीत भेटलो होतो.” एवढंच नाही, तर ईशाने असा दावा देखील केला की, सलमानच्या कुटुंबातील एका सदस्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला होता.
 
मात्र खान Salman Khan कुटुंबाने या सर्व दाव्यांचं खंडन करत स्पष्ट सांगितलं की, "सलमानने कोणालाच घरी बोलावलेलं नव्हतं." दरम्यान, बिल्डिंगच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर ईशाला ताब्यात घेण्यात आलं. तिच्यावर बेकायदेशीर घुसखोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेच्या एक दिवस आधी, २० मे रोजी, छत्तीसगडमधील २३ वर्षीय जितेंद्र कुमार सिंह या युवकाने देखील सलमानच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. “मी सलमानचा चाहता आहे आणि त्याला भेटण्यासाठी आलो होतो,” असं त्याने सांगितलं. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवत पोलिसांच्या हवाली केलं.या दोन्ही घटनांमुळे सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या हेतूबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0