तळोधी (बा.),
Tiger captured नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात दोघांचा बळी घेणार्या टीएटीआर-224 या 5 वर्षीय नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गंगासगर हेटी बीटातील सावरला रिट येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी या वाघाला बेशुध्द करून जेरबंद करण्यात आले. 15 एप्रिल रोजी गंगासगर हेटी बीट नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक 90 मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या मारोती सखाराम बोरकर (60) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते.
तर 18 मे रोजी वाढोणा येथील मारोती नकटू शेंडे (64) हे अलेवाही बीटात कक्ष क्रमांक 697 मध्ये तलावाच्या शेतशिवारात तेंदूपत्ता संकलन करीत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. Tiger captured रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली होती.
वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करीत होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांकडून वाघ पकडण्याची परवानगी घेतल्यानंतर. ब्रम्हपुरी वन विभागाचे वनसंरक्षक राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा, Tiger captured पशुवैद्यकीय अधिकारी, (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे, नेमबाज अजय मराठे यांनी तळोधी बाळापूर वन परिक्षेत्रातील सावर्ला बिट येथील सरकारी जमीन सर्वे क्रमांक 2 येथे टीएटीआर-224 या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले. त्यास नागपूर येथील डब्ल्यूआरटीसी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
या मोहिमेस तळोधी वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार त्यांच्या नेतृत्वाखाली तळोधीचे क्षेत्रसहायक अरविंद माने, वनरक्षक राजेंद्र भरणे, विकास ताजने, योगेश लकडे, प्रफूल वाटगुरे, गुरूनानक ढोरे, दिपेश टेंभरे, वाशिम शेख, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर, Tiger captured घनश्याम लोणबळे, पंडित मेकेवाड, यश कायरकर, जीवेश सयाम यांच्यासह चंद्रपूर व सिंदेवाही परिसरातील वनरक्षक, पीआरटी सदस्य, वन कर्मचारी व वाहनचालकांनी सहकार्य केले.