पुणे
Vaishnavi Hagawane वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज पहाटे मोठी कारवाई करत पोलिसांनी फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अटक केली. हे दोघे गेल्या सात दिवसांपासून फरार होते. अखेर बावधन परिसरातून आज (२३ मे) पहाटे ४.३० वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
१६ मे Vaishnavi Hagawane रोजी वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर लगेचच पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हे पोलीस तपासापासून सातत्याने दूर होते. त्यांच्या अटकेसाठी सहा विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.
छळ, मारहाण व बाळावरून धमकीचे आरोप
वैष्णवीच्या Vaishnavi Hagawane वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नात ५१ तोळे सोनं, चारचाकी वाहन आणि अन्य दागदागिने दिल्यानंतरही सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला. किरकोळ कारणांवरून चारित्र्यावर संशय घेत सतत मारहाण केली जात होती. तिच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या शवविचारण अहवालातही मारहाणीच्या खुणा स्पष्ट झाल्या आहेत.
नव्या तपशीलाने खळबळ
या प्रकरणाशी Vaishnavi Hagawane संबंधित एक वेगळा धक्कादायक तपशीलही समोर आला आहे. वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याच्या ताब्यासाठी तिच्या माहेरच्यांनी २० मे रोजी निलेश चव्हाण याच्याकडे भेट दिली असता, त्याने त्यांना पिस्तुल दाखवत घराबाहेर काढले. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात निलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश हा शशांक आणि करिश्मा हगवणे यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे.
तपासाला वेग
हगवणे कुटुंबीयांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप असून, अटकेत असलेल्या सर्व आरोपींना चौकशीसाठी हजर करून पुढील तपास गतीने सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून लवकरच अधिकृत खुलासा होण्याची शक्यता आहे.