'या' अभिनेत्यावर बलात्कारासह अश्लीलतेचा गंभीर आरोप

टीव्ही अभिनेता एजाज खान पुन्हा वादात

    दिनांक :24-May-2025
Total Views |
मुंबई,
Eijaz Khan प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकला आहे. एका महिला अभिनेत्रीने एजाज खानवर बलात्काराचा आरोप करत मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. महिलेचा आरोप आहे की, एजाजने लग्नाचे आमिष दाखवून आणि 'हाऊस अरेस्ट' या वेब शोमध्ये भूमिका देण्याचे सांगत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. विशेष म्हणजे, हे प्रकार एकदाच नव्हे तर अनेक वेळा घडल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
 
 
 
Eijaz Khan rape case controvers
महिलेच्या Eijaz Khan  तक्रारीनुसार, एजाजने आधी तिच्याशी मैत्री केली आणि नंतर शूटिंगदरम्यान लग्नाचा प्रस्ताव दिला. त्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार जबरदस्ती केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एजाज खान सध्या फरार आहे. त्याचा मोबाईल फोन बंद असल्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस करणे पोलिसांना कठीण जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथकही तयार केले आहे.
 
 
दरम्यान, एजाज खानने या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. आता त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. या अर्जावर २ जून रोजी सुनावणी होणार आहे.
 
 
अश्लीलतेचा आरोपही गंभीर
 
 
दरम्यान,Eijaz Khan  एजाज खानविरुद्ध आणखी एक गुन्हा आंबोली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. उल्लू अॅपवर प्रदर्शित झालेल्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमुळे त्याच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शोमधील काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यात स्पर्धकांना अश्लील पोझेस देण्याचे टास्क दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे लोकांनी तीव्र आक्षेप घेत शो बंद करण्याची मागणी केली. वाढत्या वादानंतर उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’चे सर्व भाग आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत.
सध्या Eijaz Khan  एजाज खान दोन गंभीर खटल्यांना सामोरे जात असून त्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पोलिस त्याचा शोध घेण्यात व्यस्त असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे घडामोडी होण्याची शक्यता आहे.