…तेव्हा सासऱ्यांनी माझे कपडे फाडले

मयुरी हगवणेच्या नव्या आरोपांनी खळबळ

    दिनांक :24-May-2025
Total Views |
पुणे,
Mayuri Hagawane वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर हगवणे कुटुंबातील एकापाठोपाठ एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मोठी सून मयुरी जगताप हगवणे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा हगवणे कुटुंबातील वादळ पेटले आहे. मयुरी सध्या माहेरी राहत असून, माध्यमांशी बोलताना तिने आपल्यावर झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाचे भयावह चित्र मांडले आहे.
 
 

Mayuri Hagawane 
"आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे"
मयुरी Mayuri Hagawane  हगवणे यांच्या आरोपानुसार, तिचा पती घरी नसताना दीर शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे हे चौघे मिळून तिला बेदम मारहाण करत होते. “आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे. त्यांनीच मला माहेरी आणून सोडले, म्हणून मी वाचले. त्यांच्या कुटुंबातील क्रौर्य त्यांनाही माहित होते,” असे मयुरी हगवणे यांनी स्पष्टपणे सांगितले.फक्त मयुरीच नव्हे तर धाकटी सून वैष्णवी हगवणे हिला देखील याच प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले, असा गंभीर आरोप मयुरी हगवणे यांनी केला. त्यामुळे वैष्णवीच्या मृत्यूपाठी हगवणे कुटुंबातील छळ हे एक महत्त्वाचे कारण असल्याचा संशय अधिक गडद होत आहे.
 
 
हुंड्यासाठी छळाचे धक्कादायक दावे
 
 
शशांक Mayuri Hagawane  हगवणे याला सतत महागड्या वस्तू हव्या असत, असा आरोप करताना मयुरी हगवणे यांनी सांगितले की, “सासूबाईंनी स्वतः वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्यूनर कारची मागणी केली होती. हे मी स्वतः ऐकले आहे.” या प्रकारामुळे हुंड्यासाठी झालेल्या छळाचे चित्र अधिक स्पष्ट होते.मयुरी हगवणे यांनी यापूर्वी शशांक हगवणे याने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्याचेही सांगितले. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांची चौकशी सुरू आहे.या सगळ्या घटनांमुळे हगवणे कुटुंबातील महिलांवरील अत्याचार, कुटुंबातील आंतरिक हिंसाचार आणि छळाचे गांभीर्य अधिक उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.