‘भूल चुक माफ’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड

25 May 2025 15:11:33
मुंबई,
Bhool Chuk Maaf Movie बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांचा नवा चित्रपट ‘भूल चुक माफ’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला असून, त्याच्या कथा-विषयाला व अभिनयाला विशेष पसंती मिळत आहे.
 
 

Bhool Chuk Maaf box office collection 
या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत सुमारे १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ७ कोटी, तर दुसऱ्या दिवशी ९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाची एकूण हिंदी ऑक्युपन्सी २५.१८% होती. सध्या या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.२ रेटिंग मिळाले असून, हे रेटिंग प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद दर्शवते.
 
 
चित्रपटाची Bhool Chuk Maaf Movie  कथा एका अशा पुरुषाभोवती फिरते, जो लवकरच लग्न करणार असतो. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशी तो वेळेच्या चक्रात अडकतो आणि पुन्हा पुन्हा त्या दिवसाचा अनुभव घेत राहतो. ही अनोखी संकल्पना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून, संजय मिश्रा, रघुबीर यादव, सीमा पाहवा आणि झाकीर हुसेन यांच्याही दमदार भूमिका आहेत. विशेषतः संजय मिश्रा यांच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे.राजकुमार रावचा याआधीचा चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ होता, ज्याने पहिल्या दिवशी ५.५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ६.९ कोटी रुपये कमावले होते. मात्र, ‘भूल चुक माफ’ या नव्या चित्रपटाला त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.दरम्यान, राजकुमार रावचा ब्लॉकबस्टर ठरलेला ‘स्त्री २’ हा चित्रपटदेखील यंदाच प्रदर्शित झाला होता. त्याने पहिल्या दिवशी ५१.१८ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ३१.४ कोटी रुपयांची कमाई केली होती.‘भूल चुक माफ’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि यामुळे आगामी काळातही या चित्रपटाच्या कमाईत भर पडण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0