नवी दिल्ली,
Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, २६ मे रोजी दोन नवीन रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये साबरमती-वेरावल वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. गुजरात दौऱ्यादरम्यान दाहोद येथून पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या दोन्ही रेल्वेसेवेचे उद्घाटन करणार आहेत.
रेल्वे Narendra Modi बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती व प्रचार) दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या दोन्ही नवीन रेल्वेंचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे."पहिली ट्रेन साबरमती-वेरावल वंदे भारत एक्सप्रेस असून ती साबरमती स्थानकाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिराजवळील वेरावलशी जोडणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस (गुरुवारी वगळता) धावणार असून, आठ कोच असलेल्या या ट्रेनमुळे सोमनाथला जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.दुसरी ट्रेन वलसाड-दाहोद एक्सप्रेस ही वलसाड आणि दाहोद यांच्यामध्ये दररोज धावणार आहे. या ट्रेनमध्ये १७ डबे असतील. वलसाडहून सुटणारी ही ट्रेन क्रमांक 19011 असेल, तर दाहोदहून वलसाडकडे येणारी ट्रेन क्रमांक 19012 असेल. ही सेवा आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहणार असून, ट्रेन सकाळी ५:५० वाजता सुरू होऊन सुमारे ३४६ किलोमीटरचा प्रवास करेल.या नव्या रेल्वेगाड्यांमुळे गुजरातमधील प्रवास अधिक सोयीस्कर आणि गतिमान होणार असून, प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.