वर्धेतील फुटपाथ शिकवणी वर्गांना आंदण?

    दिनांक :25-May-2025
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Sidewalk teaching in Wardha काही वर्षांपूर्वी शहरातील नावाजलेल्या शाळा वा कॉलेजमध्ये मुलांना प्रवेश देणे हा पालकांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरत होता. आता नेमके उलटे झाले आहे. पाल्यांना नामधारी शाळा, कॉलेज आणि नावाजलेले शिकवणी वर्गात प्रवेश अशी धारणा झाली आहे. वर्धेसारख्या छोट्या जिल्हास्थानावर शिकवणी वर्गांचा कोंबड बाजार झाला आहे. येथे पहाटेपासुन हजेरी लावणार्‍या विद्यार्थ्यांच्या वाहनांसाठी पंचतारांकीत शिकवणी वर्गापुढे जागा नसल्याने रस्त्याच्या कडेला फुटपाथवर वाहनं अस्थाव्यस्त असतात. गोपुरी चौकातील वाहनं महामार्गावर येतात तर डेहनकर लेआऊटमध्ये निमुळता रस्ता आजूनच आकुंचित झाला आहे.
 
 
Sidewalk teaching in Wardha
 
सध्या शाळा, कॉलेजमध्ये न जाताही बोर्डाची परीक्षा देण्याचे जुगाड खाजगी शिकवणी वर्ग घेणारे लावून देतात. त्यावेळी शाळा आणि कॉलेजची १०० टक्के हजेरीची अट शिथील झालेली असते. नववीत असताना दहावी आणि दहावी होताच बारावी असाच विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहे. शिक्षणाची लागलेली स्पर्धा लक्षात घेता डोनेशन देऊन शिक्षक किंवा प्राध्यापक होण्यापेक्षा घरच्या घरी शिकवणी वर्गाचे खुराडे तयार करून लाखो रुपयांचे पॅकेज घे लागले आहेत. Sidewalk teaching in Wardha शाळेत एका वर्गात ४० पेक्षा जास्त विद्यार्थी झाल्यास दुसरा वर्ग करण्याची शिक्षण विभागाची अट आणि पालकांची शिक्षणाप्रति आत्मियता लगेच जागृत होते. परंतु, खाजगी शिकवणी वर्गात किमान ५० ते १०० विद्यार्थी बसवले जात असल्याचे सांगण्यात येते. मेरीट आणण्याची हमी घेणार्‍या या शिक्षणातील दलालांना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी माईकचा वापर करावा लागतो.
 
 
मात्र, पालकांना कसेही करून त्याच शिकवणी वर्गात आपल्या पाल्याला टाकावेसे वाटते. वर्धेतील साईनगर, डेहनकर लेआऊट हा परिसर आता खाजगी शिकवणी वर्गाचे हब झाले आहे. या भागातील रस्ते आधीच लहान आहेत. त्यातही शिकवणी वर्गाला येणार्‍या विद्यार्थ्यांची वाहनं रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतने लावून दिलेल्या गट्टूवरील फुटपाथवर आडवे उभे राहतात. जणू शासनाने यांच्या विद्यार्थ्यांसाठीच रस्त्याच्याकडेला गट्टू लावून दिले आहेत. Sidewalk teaching in Wardha ‘प्रजा’ आपली बांधीलच आहे, आपण (पती) मालकच आहोत अशा आवीर्रभाव खाजगी शिकवणी चालक आहेत. गोपुरी चौक हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या परिसरातही सकाळी ८ ते दुपारपर्यंत शिकवणी वर्ग चालतात.
 
 
धुनिवाले चौकानंतर शिकवणी वर्गापर्यंत अल्पवयीन मुलं रॉग साईड वाहनं आणतात. विशेष म्हणजे या महामार्गावर असलेल्या प्रचंड वाहतुकीत पादचार्‍यांना चालता येण्यासाठी फुटपाथ तयार केले असताना शिकवणी वर्गातील विद्यार्थी फुटपाथवरच वाहनं लावत असल्याने बस वा ट्रक जात असेल तर दुसरी दुचाकीही त्या ठिकाणाहून नेण्याची भीती वाटते, पायी चालणेही कठीण होते. विद्यार्थी संख्येची अट नसल्याने हे शिकवणी वर्ग कोंबड बाजार झाले आहेत. Sidewalk teaching in Wardha गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात डेहनकर लेआऊटमधील एका खाजगी शिकवणी वर्ग चालकाने आपण आपल्या पत्नीला प्रेमाने गुलाबाचे फुल कसे दिले होते, असा रंजक प्रसंग अवगत करत शिक्षणासोबत प्रेमाचेही धडे दिले गेले होते. याशिवाय शिकवणीचे पैसे वेळेवर न दिल्यास विद्यार्थ्यांना अपमानितही केले जात असल्याच्या अनेक घटना वर्धेत घडत असल्याचे फिरता फिरता समजले.
किती विद्यार्थ्यांकडे परवाना
शिकवणी वर्ग चालवण्यासाठीही परवान्याची गरज असते. परंतु, किती खाजगी शिकवणी वर्ग चालकांकडे हा परवाना आहे यांची नोंद शिक्षण विभागाकडे नाही. Sidewalk teaching in Wardha या खाजगी शिकवणी चालकांना गुमास्ता कायदा लागू असल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सांगितले. याशिवाय शिकवणी वर्गात दुचाकीने येणार्‍या किती विद्यार्थ्यांकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे, याची दखल कोण घेईल.