‘जुगाड’ टेक्नॉलॉजिया...बर्फाचा गोळा विकणाऱ्याची शक्कल!Video

25 May 2025 16:16:56
नवी दिल्ली,
 
 
ice golla-hack-video देशात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला असला तरी, सरलेल्या आठवड्यात उन्हाने जीवाची काहिली झाली होती. थंडाव्यासाठी कुल्फी, आईस्क्रीम, शिकंजी आणि गारेगार म्हणजेच बर्फाचा गोळा खाण्यास नागरिकांची पसंती असते. पण, चटचटत्या उन्हात हे विक्रेते मात्र चिकाटीने आपला व्यवसाय करीत असतात. व्यवसाय करतानाच जीवाला थोडा आराम मिळावा, यासाठी बर्फाचा गोळा विकणाऱ्या एका विक्रेत्याने जमविलेल्या जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
 
 
 
ice golla-hack-video
 
(फोटो : इंटरनेटवरून साभार)
 
ice golla-hack-video आपल्या सायकलवर, मर्यादीत साहित्यासोबत व्यवसाय करून रोजीरोटी कमविणाऱ्या या व्यक्तीने मस्त शक्कल लढवून उन्हाचा ताप कमी केला आहे. या विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. बर्फाचा किस पाडण्यासाठीच्या छोट्याशा मशीनवर त्यांनी हातपंखा लावला आहे. बर्फ किसताना मशीनसोबत पंखाही हलतोय आणि विक्रेत्याला छान वारंही लागतंय. इन्स्टाग्रामवर एका युझरने हा व्हिडीओ शेअर केला असून, त्याला आतापर्यंत 16 लाखांवर व्ह्युज आणि 88 हजारांवर लाईक्स मिळाले आहेत.
 
 
 
 
 
नेटकऱ्यांनी ही ‘आयडीयाची कल्पना’ उचलून धरली असून गारेगार विक्रेत्याचे कौतुक सुरू आहे. याआधी, बिकानेरच्या ऑटो चालकाने उष्णतेपासून बचावासाठी देशी जुगाड केला होता. त्याने ऑटोच्या दारांवर कूलरच्या ताट्या आणि आतल्या बाजूने फोम लावला. फोमला तो सतत ओलसर ठेवत असल्यामुळे बाहेरून येणारी उष्ण हवा त्याला आणि प्रवाशांना गार वाटते. या व्हिडीओलाही भरपूर लाईक्स आणि व्ह्युज मिळाले आहेत, हे विशेष!
Powered By Sangraha 9.0