भाजपची जिल्हा कार्यशाळा व अहिल्याबाई होळकर चित्र प्रदर्शनी
बुलढाणा,
Ahilyadevi Holkar माता अहिल्यादेवी ह्या स्त्रीशक्ती, उत्तम शासक प्रशासक होत्या आजच्या पिढीला सुद्धा त्यांच्या राज्य कारभाराचा आदर्शच आहे, एक महिला म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विचारांनी ध्येयधोरणांनी देशात राज्य कारभार सुरु आहे. भारत जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. असे प्रतिपादन भाजपा नेते प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.दि.२६ मे रोजी स्थानिक राजे गार्डन येथे भाजपाची जिल्हा कार्यशाळा भाजपाचे प्रदेश सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, आ. श्वेता महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष माजी.आ.विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. Ahilyadevi Holkar तसेच या निमित्ताने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जिवनपटावर प्रकाश टाकणारी चित्रप्रदर्शनी आयोजित करून आगळी वेगळी मानवंदना अहिल्याबाई होळकर यांना देण्यात आली.
या चित्र प्रदर्शनीचे उदघाटन प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्या कडून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत असलेल्या आ.श्वेता महाले यांनी सुद्धा जिल्हा संघटने बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, Ahilyadevi Holkar अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा सन्मान म्हणजे प्रत्येक महिलेचा सन्मान असून भाजपा ने महिला सशक्तीकरणा कडे उचललेले एक पाऊल आहे. तसेच अगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक जबाबदारी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर असून पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहे अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी बोलतांना पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली संधी ही माझ्या साठी जबाबदारी असून येणार्या निवडणूक ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत.या काळात तळागाळा पर्यंत पक्ष मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकित भारतीय जनता पक्षाचा झेंडा ताकदीने फडकवुन कार्यकर्त्यांना न्याय देऊ यासाठी प्रत्येक स्तरावरील भाजपा पदाधिकारी यांनी कामाला लागण्याचे आवाहन करून उपस्थितांत एक वेगळीच उर्जा निर्माण केली आहे. Ahilyadevi Holkar माजी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांनीही आपल्या कार्यकाळात केलेल्या पक्षकार्याची माहिती देऊन पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
याशिवाय जिल्हा कार्यशाळेस व्यासपीठावर माजी आ. तोताराम कायंदे, भाजपा प्रदेश सदस्य दिपक वारे, भाजपा जिल्हा सचिव गजानन घुले ,देवीदास पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्मिता चेकेटकर, वर्षा पाथरकर, अलका पाठक, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत, कामगार मोर्चा प्रदेश सचिव Ahilyadevi Holkar विश्राम पवार, महिला माजी जिल्हाध्यक्ष सिंधु खेडेकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ माळी, जिल्हा सचिव दत्ता पाटील, चंद्रकांत बर्दे, सुनील देशमुख डॉ. राजेश्वर उबरहंडे, मंदार बाहेकर, अरविंद होंडे, नाना सराफ, सखाराम नरोटे, गजानन घोगंडे, यासह सर्व मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते