नवी दिल्ली,
Rajya Sabha elections 2025 निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या आठ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या असून, येत्या १९ जून रोजी मतदान होणार आहे. यात तामिळनाडूच्या सहा आणि आसामच्या दोन जागांचा समावेश आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ जून व जुलै महिन्यात संपत असल्याने ही द्वैवार्षिक निवडणूक घेतली जात आहे. मतमोजणी देखील १९ जून रोजी संध्याकाळीच पार पडणार आहे.
तामिळनाडूतील सहा जागांसाठी मतदान तामिळनाडूमधील ज्येष्ठ नेते अंबुमणी रामदास (पट्टाली मक्कल कच्ची), एन. चंद्रशेखरन (एआयएडीएमके), एम. षण्मुगम, पी. विल्सन (द्रमुक) आणि वैको (मारुमलारची द्रविड मुन्नेत्र कळगम) यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२५ रोजी संपणार आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
आसाममधील दोन Rajya Sabha elections 2025 जागांवर निवडणूक आसामचे राज्यसभा सदस्य वीरेंद्र प्रसाद वैश्य आणि मिशन रंजन दास (दोघेही भाजप) यांचा कार्यकाळ १४ जून २०२५ रोजी संपत आहे. त्यामुळे या दोन जागांवरही निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना २ जून रोजी जारी होणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
पाच विधानसभा पोटनिवडणुकाही १९ जूनला दरम्यान, आयोगाने देशातील चार राज्यांमधील पाच विधानसभा जागांवर पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील या पोटनिवडणुकांकरिता मतदान १९ जून रोजी होणार असून, २३ जून रोजी मतमोजणी करण्यात येईल.