अखेर धामणगावातील भुयारी मार्ग उघडला

26 May 2025 21:28:26
धामणगाव रेल्वे,
The subway opened गौरक्षणजवळ रेल्वेच्या दुसर्‍या भुयारी मार्गाचे रेल्वे विभागाचे काम चालू असल्याने मागील वीस दिवसापासून या मार्गाने होणारी वाहतूक बंद होती. परिणामी रेल्वे फाटकाजवळ धामणगावकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, तसेच वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यामुळे स्थानिक नागरिकांसह विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक त्रस्त होते. फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. रविवारी तरुण भारतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच सोमवारी सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
 
 
The subway opened
 
गौरक्षणजवळ दुसर्‍या भुयारी मार्गाचे कार्य सुरू असल्यामुळे पूर्वीचा भुयारी मार्गसुद्धा मागील वीस दिवसापासून बंद करण्यात आला होता. The subway opened दररोज होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा म्हणून येथील गौरक्षण संस्थेजवळ भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या भुयारी मार्गाजवळ रेल्वेचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गातील वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतुकीचा संपूर्ण भार रेल्वे फाटकावर आला असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
 
 
मुंबई ते कोलकाता लोहमार्गावर जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये रेल्वे फाटकावर उड्डाणपूल झालेले आहे. धामणगाव शहरातधामणगावचीच वाहतूक नव्हे तर परिसरातील ९८ गावे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रवाशांना मध्यप्रदेश जाण्याकरिता धामणगाववरूनच जावे लागते, त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. The subway opened गौरक्षणजवळ सध्या अप व डाऊन करिता २ वेगवेगळे भुयारी मार्ग तयार करण्यात आलेले आहेत; परंतु ही कायमस्वरूपी व्यवस्था नसून धामणगावला रेल्वे फाटकावरून उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. शासनाने ही गोष्ट लक्षात ठेवून उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Powered By Sangraha 9.0