पुन्हा बुराडीसारखे प्रकरण...एकाच कुटुंबातील सात जणांची कारमध्ये सामूहिक आत्महत्या

27 May 2025 09:23:54
पंचकुला,
Panchkula mass suicide हरियाणाच्या पंचकुला शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे देहरादूनमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. हे संपूर्ण प्रकरण पंचकुलाच्या सेक्टर २७ चे आहे. एकाच कुटुंबातील ७ जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पंचकुला येथील सेक्टर २७ मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये सातही जणांचे मृतदेह बंद अवस्थेत आढळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे डेहराडूनमधील एका कुटुंबाने मोठ्या कर्जामुळे आणि आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्याचे प्रकरण आहे.
 
 
 
Panchkula mass suicide
 
मृतांमध्ये डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल (४२), प्रवीणचे पालक, प्रवीणची पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. मात्र, त्यात काय लिहिले आहे याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पोलीस याचा तपास करत आहेत. Panchkula mass suicide पंचकुला पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमित दहिया म्हणाले, आम्ही सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही परिसरातील लोकांची चौकशी करत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहोत.
 
सर्व सातही मृतदेह पंचकुला येथील खाजगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था अमित दहिया घटनास्थळी पोहोचले आणि तपासात गुंतले आहेत. याशिवाय, Panchkula mass suicide फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आणि तपासणीसाठी नमुने गोळा केले. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्येही खळबळ उडाली आहे. सध्या पंचकुला पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण तपासानंतरच कळेल. 
Powered By Sangraha 9.0