नागपूर,
Ajni Railway Station : अजनी रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत एका प्रवाशाचा हरवलेला टॅबलेट शोधून परत केला. महिला प्रवाशाने आरपीएफच्या अजनी ठाण्यात तक्रार दिली की, गाडी क्रमांक १२२८९ एक्स्प्रेसच्या ए-३ कोचमधील बर्थ क्रमांक ४६/४८ वरून टॅबलेट प्रवासादरम्यान हरवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नागपूरकडे येत असताना मंगळवार, २७ मे रोजी ही घटना घडली. घरी पोहोचल्यानंतर टॅबलेट हरवल्याचे लक्षात आले. या माहितीच्या आधारे आरपीएफचे प्रधान रक्षक पवार यांना अजनी यार्डमधील प्रस्थान लाईन क्रमांक १ वर उभ्या असलेल्या गाडीची करण्यास पथकाला पाठविले. कोचची तपासणी करूनही सुरुवातीला टॅबलेट सापडला नाही. त्यानंतर कोच अटेंडंटशी संपर्क साधला असता त्यांनी टॅबलेट सापडल्याचे आणि तो सुरक्षित ठेवल्याचे सांगितले. कोच अटेंडंटने तो टॅबलेट पवार यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर खात्री करून टॅबलेट मुळ परत केला. केला. नंतर आरपीएफ पोस्ट अजनी येथे आणण्यात आला. प्रवाशांनी मौल्यवान वस्तूंची घ्यावी. वस्तू हरवल्यास त्वरित जवळच्या आरपीएफ ठाण्याला संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.