ऐतिहासिक पराक्रम! गाण्याच्या मैफलीत इतिहास रचणार 'अरिजीत सिंग'

लंडनमध्ये स्टेडियममध्ये होणार भव्य सादरीकरण

    दिनांक :28-May-2025
Total Views |
लंडन ,
Arijit Singh आपल्या सुमधूर आवाजाने जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अरिजीत सिंग आता एका ऐतिहासिक परफॉर्मन्ससाठी सज्ज झाला आहे. येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी लंडनच्या टॉटनहॅम हॉटस्पर स्टेडियममध्ये अरिजीत सिंग मुख्य गायक म्हणून सादरीकरण करणार आहे. अशा प्रकारच्या मोठ्या स्टेडियममध्ये सादर करणारा तो पहिला भारतीय कलाकार ठरणार आहे.
 

Arijit Singh London concert 2025 
बॉलिवूडमध्ये Arijit Singh एकामागून एक हिट गाणी गाऊन प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अरिजीतच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. त्याच्या गाण्यांनी अनेकदा प्रेक्षक भावविवश झाले आहेत. त्याच्या गाण्यांमध्ये असलेली भावनिकता आणि गोडवा यामुळे तो आजच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय गायक ठरला आहे.अरिजीत सिंगला आतापर्यंत पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. सध्या तो स्पॉटिफाय वर जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असलेला गायक आहे. त्याने टेलर स्विफ्ट, एड शीरन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांनाही या यादीत मागे टाकले आहे.
 
 
या ऐतिहासिक Arijit Singh परफॉर्मन्सबद्दल अरिजीत सिंग म्हणाला, “मी फक्त एक सामान्य माणूस आहे जो गाणं गातो. लंडनमध्ये पुन्हा गाण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जर मी इतिहास रचणार असेल, तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.”हा कॉन्सर्ट अरिजीतच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार आहे आणि भारतीय संगीत क्षेत्रासाठीही तो अभिमानाचा क्षण असेल.