बाल संस्कार शिबिराचा समारोप

28 May 2025 17:31:26
नागपूर,
Laxmi Nagar Nagpur लक्ष्मीनगर बुटी लेआऊट येथील सिद्ध गणेश मंदिरात सेवावस्तीतील मुलांसाठी शिबिर घेण्यात आले होते. १०दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप झाला.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. अंजली साठे ह्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.बनगीरवार व देशमुख ह्यांनी गणेश वंदना गीत सादर केले.मुलांनी‌‌ वर्गात शिकविलेले आसन, प्राणायाम ओमकाराचे सादरीकरण केले.
 
 
shibir
 
प्रमुख वक्ता शशीकांत मंगरूकर यांचा परिचय अनंत चिखलीकर यांनी करून दिला आणि १० दिवसात घेतलेल्या कार्यक्रमाचा अहवाल सांगितला. Laxmi Nagar Nagpur  शशीकांत मंगरुळकरांनी मुलांशी व पालकांशी संवाद साधून ह्या शिबिराच्या आयोजनाचा हेतू सांगितला. नगर संघचालक धंनजय कोंडावार.नगर कार्यवाह सुरेश देव, धर्म जागरणच्या प्रिती भडभडे यावेळी उपस्थित होते. पर्यावरणाच्या शुद्धतेसाठी प्रयत्न, प्लास्टिकचा अनावश्यक वापर,याविषयी जागरूकता ठेवावी हा विचार प्रत्येकाने अधोरेखित केला. धंनजय कोंडावार ह्यांनी दैनंदिन स्तरावर हे कार्य सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नशील राहु असे सांगितले. प्रिती भडभडे ह्यांनी पालकांशी संपर्क साधला मुलांनी काढलेल्या व रंगविलेल्या चित्र प्रदर्शनाचे सर्वांनी कौतुक केले .तिवसकर ह्यांनी आभार प्रदर्शन केले.आजच्या खाऊची जबाबदारी मंदिर प्रशासनाने धेतली.
सौजन्य:अंजली साठे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0