Video खरचं नाहो ‘तिकीट घेतलेलं आहे भाऊनं!’

AI तयार केलेल्या कांगारूचा भन्नाट व्हिडिओ भन्नाट

    दिनांक :28-May-2025
Total Views |
video AI इंटरनेटवर स्क्रोल करताना आपल्या फीडमध्ये नवनवीन कंटेंट पाहायला मिळतो – काही मजेदार, काही भावनिक, तर काही अजब-गजब! अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक गोंडस लहान कांगारू विमानतळावर बोर्डिंग पास धरून उभा असल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहून अनेक जण ‘अरेरे!’ म्हणत आश्चर्यचकित झाले आहेत.
 
video AI
 

काय आहे व्हिडिओत?
X (पूर्वीचे ट्विटर), Instagram आणि Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका महिलेसोबत तिचा पाळीव कांगारू विमानतळावर उभा असल्याचे दिसते. महिला क्रू मेंबरला कांगारूला विमानात चढण्याची परवानगी देण्याचा प्रयत्न करत आहे. कॅमेरा जेव्हा कांगारूवर झूम करतो, तेव्हा त्याचे मोठे, निरागस डोळे आणि गोंडस चेहरा पाहून कोणीही मोहरून जाईल. त्याच्या शांततेचेही नेटिझन्सनी भरभरून कौतुक केले आहे.
 
 

पण... हा व्हिडिओ खरा आहे का?
 
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ प्रत्यक्षात खरा नसून एआय (Artificial Intelligence) वापरून तयार करण्यात आला आहे. पहाताच खरा वाटावा असा हा क्षण प्रत्यक्षात घडलेलाच नाही. कोणत्याही विमानतळावर कांगारू आणले गेलेले नाहीत. हे दृश्य एआयच्या मदतीने तयार करण्यात आले असून, त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या टप्प्यावर खरंच एआयची ताकद आणि त्याचबरोबर संभाव्य धोके याची जाणीव होते.
 
 
नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
 
या एआय-निर्मित व्हिडिओवर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या.एका वापरकर्त्याने लिहिले, “विमानात बसणाऱ्या अनेक प्रौढांपेक्षा भाऊ चांगला वागतो.”दुसरा म्हणतो, “भाऊ बालीला जाण्याचा प्रयत्न करत आहे.”तर तिसरा वापरकर्ता हसत म्हणतो, “चला, त्याने तिकिटाचे पैसे दिले आहेत!”हा व्हिडिओ जरी बनावट असला, तरी त्याने इंटरनेटवर चांगलाच गदारोळ माजवला आहे. एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या अशा क्लिप्समुळे खऱ्या आणि खोट्यात फरक करणं दिवसेंदिवस अवघड होत आहे, हे मात्र नक्की!