वाह योगीजी! 24 तासांत 10 एन्काउंटर

उत्तर प्रदेशात "ऑपरेशन लंगडा’चा धडाका

    दिनांक :28-May-2025
Total Views |
उत्तर प्रदेश
operation langda  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात गुन्हेगारीवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना 'फ्री हँड' दिला आहे. याच धोरणाचा भाग म्हणून राज्यात पोलिसांकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन लंगडा’ मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ गेल्या २४ तासांत राज्यातील १० शहरांमध्ये एन्काउंटर करण्यात आले असून, अनेक कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
 
 

operation langda  
राज्य operation langda  सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणामुळे पोलिस आता गुन्हेगारांवर थेट कारवाई करत आहेत. एन्काउंटरच्या या मालिकेमुळे राज्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
२४ तासांत कुठे काय घडले?
लखनऊ – बलात्काराच्या आरोपीचा एन्काउंटर
गाझियाबाद – पोलिस कॉन्स्टेबलच्या खुनातील आरोपीला अटक
शामली – २५ हजारांचे बक्षीस असलेल्या गाय तस्कराशी चकमक
झांसी – वॉन्टेड गुन्हेगाराला गोळी
बुलंदशहर – बलात्काराच्या आरोपीवर पोलिसांची गोळीबार
बागपत – दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
आग्रा – चोरीच्या आरोपीवर एन्काउंटर
जालौन – दरोड्याच्या आरोपीला गोळी
बलिया – फरार गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई
उन्नाव – कुख्यात गुन्हेगाराशी थरारक चकमक
 
काय आहे ‘ऑपरेशन लंगडा’?
 
‘ऑपरेशन लंगडा’ operation langda  ही उत्तर प्रदेश पोलिसांची विशेष मोहीम असून, या अंतर्गत गुन्हेगारांना पकडण्यासाठी चकमकीदरम्यान त्यांच्यावर त्यांच्या पायांवर गोळी झाडली जाते. उद्देश एकच – गुन्हेगार शारीरिकदृष्ट्या अक्षम करणे, जेणेकरून तो भविष्यात गुन्हा करू शकणार नाही. पळून जाण्याचा किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या पायात गोळ्या झाडून त्यांना लंगडा केले जाते. त्यामुळेच या मोहिमेला 'ऑपरेशन लंगडा' असे अनौपचारिक नाव प्राप्त झाले आहे.योगी सरकारच्या या कठोर कारवाईमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारली असून, पोलिसांची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.