नागपूर उपनगरांपर्यंत ३२ मेट्रो स्थानक

29 May 2025 17:49:40
नागपूर,
metro stations शहराच्या चारही दिशांना जोडण्यासाठी मेट्रो रेले फेज-२ चे कामठी, वर्धा, हिंगणा आणि भंडारा महामार्गांवर वेगात सुरू आहे. यात कामठी मार्गावरील पिवळी नदी, ऑल इंडिया रेडिओ आणि लोकविहार या तीन मेट्रो स्टेशनच्या पाइलचे कार्य १०० टक्के पूर्ण झाले आहे.
 

 32 metro stations up to Nagpur suburbs 
नागपूर metro stations मेट्रो रेल फेज-२ मध्ये एकूण ४३.८ किलोमीटरच्या ३२ मेट्रो स्थानकांचा समावेश असून हा टप्पा नागपूर शहराच्या उपनगरांपर्यंत विस्तारित यात खापरी ते एमआयडीसी या १८.५ किमी मार्गावर इको पार्क, मेट्रो सिटी, अशोक वन, डोंगरगाव, मेघदूत सीआयडीसीओ, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलनी, एमआयडीसी केईसी, एमआयडीसी ईएसआर ही १० स्थानके राहणार आहेत. प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्टनगर या ५.६ किमी मार्गावर कापसी खुर्द, ट्रान्सपोर्टनगर ही तीन स्थानके आणि १३ किलोमीटरचा ऑटोमोटिव्ह स्क्वेअर कान्हान मार्गावर पिवळी नदी, खासराफाटा, ऑल इंडिया रेडिओ, खैरीफाटा, लोकविहार, लेखानगर, कॅन्टोन्मेंट, पोलीस स्टेशन, गोल्फ क्लब, कान्हान नदी ही १२ स्थानके राहतील.
 
 
मेट्रो रेल मार्ग ४३.८ किलोमीटरचा
 
 
लोकमान्यनगर metro stations ते हिंगणा ६.७किमी मार्गावर हिंगणा माउंट व्ह्यू, राजीवनगर, वानाडोंगरी, एपीएमसी, रायपूर, हिंगणा बसस्टॅण्ड, हिंगणा ७ स्थानके राहणार आहेत. कामठी महामार्गावरील पिवळी नदी, ऑल इंडिया रेडिओ आणि मेट्रोस्टेशनच्या पाइलचे कार्य पूर्ण झाले आहे. उर्वरित रिचमधील अन्य कार्य गतीने सुरू आहे. ज्यामध्ये कामठी महामार्ग रिच-२ ए यात आटोमोटिव्ह चौक ते कन्हानपर्यंतच्या मार्गावर पियर ६८ टक्के, पाइल कॅप ७७ टक्के, सेगमेंट कास्टिंग ४० टक्के आणि स्पॅन इरेक्शनचे २६ टक्के पूर्ण झाले आहे. नागपूर मेट्रो रेल फेज-२चे निर्माणकार्य पूर्ण युद्धपातळीवर काम सुरू आहे.
 
 
 
रस्ते विकासासाठी माफसूची जागा देणार
तेलंगखेडीतील जागेवर बांधण्यात येणार्‍या २४ मीटर रस्ता’ आणि त्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी माफसूची जागा दिल्या जाणार आहे. महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठाची तेलंगखेडीतील १३,२४८ चौ. मीटर जागा रस्त्यासाठी देण्यात येणार आहे. कृषी व पशुसंवर्धन खात्याने ही महसूल खात्याकडे वर्ग केली असून महापालिका तेथे रस्ते बांधणी करणार आहे. शहर विकास आराखड्यात माफसूच्या तेलंगखेडीतील जागेवर २४ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. तो बांधण्यासाठी विद्यापीठाने १३, २४८ चौ. मीटर जागा महापालिकेकडे हस्तांतरित’ करावी, असा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने ऑगस्ट २०२२ मध्येच त्याला मान्यता दिली होती. त्यासंदर्भातील महसूल खात्याच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. महसूल खात्याने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे.
Powered By Sangraha 9.0