खाजगी ट्रॅव्हल्स बसेसला शहराबाहेर नेऊ नका

29 May 2025 21:29:27
नागपूर, 
Private Travels Bus : खाजगी ट्रॅव्हल्स बसेसचे थांबे शहराबाहेर नेण्यास अ.भा. ग्राहक पंचायतने विरोध दर्शवत त्यामुळे उलट प्रवाशांची प्रचंड आर्थिक गैरसोय होणार असल्याचे पोलिस व आरटीओला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
 
 
kl
 
पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. खाजगी ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीला अडथळा होणाच्या कारणास्तव वर्धा रोडवरील खापरी, अमरावती रोडवरील वाडी, भंडारा रोडवरील कामठीला खाजगी ट्रॅव्हल्स हलविण्याचा निर्णय झाल्याचे कळते. परंतु या निर्णयामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार असून त्या प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
 
 
काही चौकांमध्ये खाजगी ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्यावर वाहतूक पोलिस व आर.टी.ओ. यांनी कारवाई करावी. परंतु सरसकट खाजगी ट्रॅव्हल्सला शहराबाहेर काढणे हा उपाय नाही. भरधाव ट्रक, टेंपो, मेटॅडोर यांचेमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा तसेच वाहतुकीची कोंडीही होत आहे. प्रसंगी अपघातसुद्धा होतात.
 
 
काही ठिकाणी तर भरवस्त्यांमध्ये ट्रक, टेंपो, मेटॉडोर व इतर चारचाकी वाहने रस्त्यांवर उभे केल्याने वाहतुकीला अडथळा, वाहतुकीची कोंडी होते. अडथळा, कोंडी, फुटपाथवर अतिक्रमण करणाèयांना प्रशासनाचा कुठलाही धाक उरलेला नाही. याबद्दल कारवाई करण्याची मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे, प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, अ‍ॅड. विलास भोसकर, उदय दिवे, अनिरुद्ध गुप्ते, प्रकाश भुजाडे, श्रीपाद हरदास, विनायक इंगळे, अरविंद हाडे, अ‍ॅड. अनिरुद्ध दंडे, अजय काठोळे, राजु पुसदेकर व इतर पदाधिकाèयांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0