नागपूर,
Purushottam Darvekar : नागपूर, विदर्भासह महाराष्ट्रात आपल्या अजरामर नाट्यकृतींनी नावाजलेले व नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे सुप्रसिद्ध नाटककाार दिवंगत पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा 1 जून हा जन्मदिवस आहे.
यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. वि.सा. संघाच्या वतीने रविवारी 1 जूनला संध्याकाळी 5.30 वाजता त्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. ग्रंथ सहवासमध्ये वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित राहतील.