ओडिशा,
Naxalite leader arrested Kunjam Hidma नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला मोठे यश मिळाले असून, कुख्यात नक्षलवादी आणि एरिया कमिटी सदस्य कुंजम हिडमा याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील बैपारीगुडा पोलिसांनी पेटगुडा जंगलातून त्याला अटक केली. या कारवाईत ए.के. ४७ रायफलसह मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि माओवादी साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.
विशेष ऑपरेशनमध्ये यश
वृत्तसंस्था Naxalite leader arrested Kunjam Hidma ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, डिस्टिक व्हॉलंटरी फोर्स (DVF) ने २८ मे रोजी रात्री विशेष ऑपरेशन सुरू केले होते. सकाळच्या सुमारास टेकडीवर नक्षलवाद्यांचा एक गट तळ ठोकून असल्याचे आढळले. सुरक्षा दलांनी घेराव टाकताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि जंगलात पळून गेले. प्रत्युत्तरात DVF टीमनेही गोळीबार केला. याचदरम्यान झुडुपामध्ये लपून बसलेला कुंजम हिडमा पकडला गेला.
स्फोटके आणि माओवादी साहित्य जप्त
हिडमाच्या Naxalite leader arrested Kunjam Hidma ताब्यातून एक AK-47 रायफल, ३५ जिवंत काडतुसे, २७ इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, ९० नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, २ किलो गन पावडर, २ स्टील कंटेनर, २ रेडिओ, १ इअरफोन, १ मोटोरोला वॉकी-टॉकी, १० बॅटऱ्या, २ चाकू, १ लहान कुऱ्हाड (कतुरी), ४ टॉर्च लाईट, १५ माओवादी साहित्य आणि इतर विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
कुंजम हिडमा कोण आहे?
कुंजम हिडमा उर्फ मोहन हा नक्षल चळवळीतील एक कट्टर कार्यकर्ता असून तो सध्या नक्षली एरिया कमिटीचा सदस्य होता. २००७ मध्ये वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बाल संघम आणि जन नाट्य मंडळीतून त्याने नक्षल चळवळीत प्रवेश केला. पुढे सैन्य प्रशिक्षण घेतल्यानंतर तो सक्रिय नक्षली कारवायांमध्ये सहभागी झाला. २०१३ ते २०१५ या काळात उसुर लोकल ऑर्गनायझेशन स्क्वाडमध्ये तो कार्यरत होता. २०१६ मध्ये आंध्र प्रदेश सीमेवरील प्लाटूनमध्ये त्याची नियुक्ती झाली. २०१९ मध्ये त्याला एरिया कमिटी सदस्य म्हणून पदोन्नती मिळाली.हिडमाचा चांदमेटा, कोंडाझारी, कुंभीखारी आणि कोलेंगडब्बा येथील नक्षली हल्ल्यांमध्ये थेट सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या अटकेने नक्षल चळवळीला मोठा आघात बसल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.