चेन्नई,
Tamil actor Rajesh तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश (वय ७५) यांचे निधन झाले. रक्तदाब वाढल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दक्षिणेतील चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
राजेश Tamil actor Rajesh यांनी त्यांच्या कारकिर्दीत १५० हून अधिक तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘अवल ओरू सुरत कथा’ या चित्रपटातून त्यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘कन्नी पारुवाथिले (१९७९)’, ‘थानी मारम (१९८०)’, ‘थाई पोंगल (१९८०)’, ‘नान नानेथन (१९८०)’, आणि ‘अंधा ७ नाटक (१९८१)’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. राजेश विल्यम्स या नावानेही ते परिचित होते.या वर्षी देखील त्यांनी काही महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. रजनीकांत, थलापती विजय, मोहनलाल, विजय सेतुपती यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते.
सुपरस्टार Tamil actor Rajesh रजनीकांत यांनी राजेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या एक्स (माजी ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी तमिळ भाषेत लिहिले की, "माझ्या जवळच्या मित्र राजेशच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे आणि खूप दुःख झाले आहे. एक अद्भुत व्यक्ती... त्याच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे."राजेश यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव चेन्नईतील रामपुरम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अमेरिकेत असलेली त्यांची मुलगी परतल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.