हिंगणघाटात ५ नवीन बसेस दाखल

पुन्हा ५ नवीन बसेस मार्गावर

    दिनांक :03-May-2025
Total Views |
हिंगणघाट,
new buses वर्धा राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगाराच्या ताफ्यात आज नवीन ५ अत्याधुनिक सुविधायुत बसेस दाखल झाल्या. बस स्थानकात सकाळी ११ वाजता नवीन बसेसची फित कापून हिरवी झेंडी दाखविण्यात आली. प्रवासी आणि वाहक-चालकांच्या समस्येवर तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून समस्या निकाली काढल्या जाईल. तसेच राष्ट्रीय संपत्ती असलेल्या या बसेसची योग्य ती देखभाल करण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या.
 
 
new buses
 
तसेच भविष्यात हिंगणघाट आगाराला बसेसची कमतरता भासू नये व प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये याकरिता आणखी ज्यादा बसेसची मागणी परिवहनमंत्री यांच्याकडे करण्यात आली असून येत्या काही महिन्यांच्या कालावधीत आणखी ५ बसेसची भर घालण्यात येणार आहे. new buses तसेच हिंगणघाट बस स्थानकाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून १५ फलाट व सुंदर असे बस स्थानक उभारण्याच्या कार्याचा सुद्धा लवकरच प्रारंभ होणार आहे.
 
यावेळी विभाग नियंत्रक प्रतापसिंह राठोड, भाजपाचे नेते किशोर दिघे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, भूषण पिसे, सुभाष कुंटेवार, किरण वैद्य, निलेश ठोंबरे, धनंजय बकाणे, विनोद विटाळे, गजानन राऊत, हेमंत राऊत, शेषराव तुळणकर, कौसर अंजूम, नलिनी सयाम, धनश्री वरघणे, वैशाली सुरकार, वंदना कामडी आदींसह हिंगणघाट आगारातील चालक-वाहक, प्रवासी उपस्थित होते.