तभा वृत्तसेवा बाेरी
Adana River बाेरी येथील नदीवरील पुलाचे बांधकाम तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या बाबत ‘तरुण भारत’ने नेहमी पाठपुरावा केला. याची संबंधित विभागानेदखल घेऊन या पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. पुलाच्या एका बाजूच्या संरक्षण भिंतीचे बांधकामही राहिले हाेते तेदेखील सुरू झाले आहे.पुलावरील डांबरीकरण आणि विद्युतीकरण राहिले असून लवकर पूर्ण हाेऊन पूल वाहतुकीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. या विषयाकडे आणि समस्येकडे तरुण भारतची नजर असणार आहे. एप्रिल व मे असे उन्हाळ्याचे दाेन महिने उरले आहेत. जूनपासून पाऊस सुरू झाल्यावर पुन्हा वाहतुकीला अडचण निर्माण हाेणार आहे.

पुलाचे थाेडेसे डांबरीकरण आणि मुख्य रस्त्याला जाेडण्याचे काम उरले आहे. ते पूर्ण झाल्यास सर्वांना वाहतुकीची साेय हाेईल. हा महामार्ग क्रमांक 243 हा यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांपैकी एक आहे. येथे नेहमीच वाहनांची माेठी गर्दी असते. मागील वर्षीदेखील वाहतूक पुलाच्या अपुèया बांकामामुळे वळणाचा रस्ता केला हाेता. पावसामुळे ताेदेखील चिखलमय हाेऊन हा मार्ग बंद झाला हाेता. त्यामुळे वाहनधारकांना माेठा ेरा पडताे. दहि\ळ मार्गे 35 किमीचा अतिरिक्त फेरा पडत असताे. मागील 3 वर्षांपासून हा पूल पूर्ण हाेईल अस आश्वासन दिले जाते. पण पूल पूर्ण हाेत नाही जिल्हा प्रशासनाने हा पूल पावसापूर्वी पूर्ण हाेईल, असे आश्वासन दिले आहे. संबंधित विभागाने पुलाचे बांधकाम त्वरित करावे, यवतमाळचा वाहतुकीचा प्रश्न साेडवावा, अशी या परिसरातील आणि जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे.