वर्धा,
Rabi seasons खरीप, रब्बी हंगामात पाहिजे तसे उत्पन्न शेतकर्याच्या हाती लागले नाही. परिणामी, जिल्ह्यातील शेतकर्यांनी उन्हाळी तीळ पिकाला प्राधान्य देऊन हजारे हेटर लागवड केली. मात्र, काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे तीळ उत्पादक शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अवकाळी पावसामुळे हजारो हेटरमधील तीळ पिकाचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे कापलेल्या तीळ पिकाला कोंब फुटले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तीळ उत्पादक शेतकर्यांकडून होत आहेत.
जिल्ह्यातील या उन्हाळी हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत तीळ लागवड दुप्पटीने केली होती. खरीप हंगामात अतिविृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, तूर यापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, शासनाकडून तुटपूंजी नुकसान भरपाई देण्यात आली. खरीप हंगामाचा खर्च काढण्यासाठी शेतकर्यांनी रब्बी हंगामात चणा, गहू पिकांची लागवड केली. मात्र, सुरुवातीला या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक धोयात आले होते. शेतकर्यांनी फवारणी करून पीक वाचविले. मात्र, उत्पन्नात कमालीची घट आली. शेतकर्यांच्या शेतमाल निघताच बाजारात शेतमालाचा भाव कमी झाले. परिणामी, लागवण केलेला खर्चही निघला नाही. खरीप, रब्बी हंगामात झालेला खर्च भरून काढण्यासाठी उन्हाळी हंगामात शेतकर्यांनी ३ हजार ८३१.७५ हेटर तीळ लागवड केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीळ लागवड क्षेत्र दुप्पट वाढले होते. गतवर्षी तीळ पिकांला १५ हजार रुपये प्रती विंटल भाव होता. त्यामुळे यार्षी उन्हाळी हंगामात तीळ लागवड मोठ्या प्रमाणात केली. तीळ पीक परिपक्व झाल्याने कापणी करून काढणी सुरू केली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाससाना चांगलाच कहर केला आहे. परिणामी, कापणी केलेल तीळ उचलणेही शय होत नाही. सततच्या पावसामुळे कापलेल्या तीळ पिकाला कोंब फुटले आहे. काही शेतकर्यांनी तीळ कापणी करून ढीग लावले. मात्र, सततच्या पावसामुळे ढिगार्यात पाणी गेल्याने कोंबे फुटले असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे तीळ उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तीळ पिकाचे पडले दर
गतवर्षी हंगामात तीळ पिकाला १५ हजार रुपये प्रति विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी तीळ लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र, पावसामुळे तीळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्नात घट आली आहे. मात्र, शेतकर्यांनी तीळ बाजारात येताच तीळ पिकाला ८ हजार ७५० रुपये प्रती विंटल भाव मिळत आहे. पावसामुुळे तीळ पिकांत मोठ्या प्रमाणात कचराकाडी पडल्याने भाव मिळत नसल्याची शेतकर्यांची ओरड आहे.