आनंद वार्ता! राज्य सरकारचा 'आषाढी वारीसाठी मोठा निर्णय!'

30 May 2025 12:27:11
पंढरपूर,
Ashadhi Wari 2025 यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्य सरकारने वारकऱ्यांच्या सेवेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार असून, वारी मार्गावरील विविध सुविधा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
 

Ashadhi Wari 2025  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Ashadhi Wari 2025  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध योजनेचा आढावा घेण्यात आला. वारी मार्गावरील रस्ते खराब असू नयेत, यासाठी डागडुजी, मुरुम, खडी व डांबरीकरणाची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
वारकऱ्यांसाठी आरोग्य व सुरक्षा सुविधा
 
 
वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यंदा समूह विमा योजनेचा लाभ वारकऱ्यांना मिळणार असून, आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरे, कार्डियक अ‍ॅम्ब्युलन्स आणि तात्पुरत्या ICU सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वतः पंढरपूर येथे भेट देऊन या सुविधा तपासणार आहेत.
 
 
नोडल ऑफिसरची नियुक्ती आणि इतर सुविधा
 
 
वारी दरम्यान Ashadhi Wari 2025 पोलिस प्रशासनाशी समन्वय राखण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच, पालखी तळांवर वीज, पाणी, वॉटरप्रूफ तंबू यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.वारकऱ्यांचे भोजन वेळेत होण्यासाठी आणि पारंपरिक धार्मिक सोपस्कार सुरळीत पार पडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून यंदाची वारी अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित करण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0