मुंबई,
Arshad Warsi शेअर बाजाराच्या नियामक संस्थेने म्हणजेच सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि इतर ५७ संस्थांवर मोठी कारवाई केली आहे. 'साधना ब्रॉडकास्ट' (Sadhana Broadcast – सध्या क्रिस्टल बिझनेस सिस्टम्स लिमिटेड) या कंपनीच्या शेअर्समध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी या सर्वांवर १ ते ५ वर्षांसाठी शेअर बाजारात गुंतवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
सेबीने Arshad Warsi सादर केलेल्या १०९ पानी तपास अहवालात, युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल करून 'पंप अँड डंप स्कीम' राबवण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिमरित्या शेअर्सची किंमत वाढवण्यात आली आणि नंतर ती विकून नफा मिळवण्यात आला.
अर्शद-मारियाने कमावले लाखो रुपये
सेबीच्या Arshad Warsi माहितीनुसार, अर्शद वारसीने या व्यवहारातून तब्बल ४१.७० लाख रुपये, तर त्याच्या पत्नीने ५०.३५ लाख रुपये बेकायदेशीर नफा कमावला. या प्रकरणी दोघांवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.या घोटाळ्यात मुख्य सूत्रधार म्हणून गौरव गुप्ता, राकेश कुमार गुप्ता आणि मनीष मिश्रा यांची नावे सेबीने नमूद केली आहेत. मनीष मिश्रा याने चालवलेल्या ‘मनीवाइज’, ‘द अॅडव्हायझर’ आणि ‘प्रॉफिट यात्रा’ या युट्यूब चॅनेल्सवर गुंतवणुकीसाठी बनावट व दिशाभूल करणारे प्रमोशनल व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. यामध्ये शेअरमध्ये मोठा नफा होईल, अशा थापा मारून लोकांना आकर्षित करण्यात आले.
५० कोटींचे नुकसान, ५८ कोटींचा नफा
या संपूर्ण Arshad Warsiप्रकरणातून ५८ संस्थांनी मिळून ५८.०१ कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा कमावल्याचे सेबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे संपूर्ण रक्कम आता १२% व्याजासह परत करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. दुसरीकडे, सामान्य गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही सेबीने स्पष्ट केले आहे.साधना ब्रॉडकास्टचे प्रवर्तक, प्रमुख गुंतवणूकदार, युट्यूब चॅनेल चालक आणि अर्शद-मारिया यांच्यासह एकूण ५९ व्यक्ती/संस्थांवर ५ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये सुभाष अग्रवाल याने मध्यस्थीची भूमिका बजावल्याचाही उल्लेख आहे.