वर्धा
Sumit Wankhede आपले एकही मत वाया जाणार नाही. मतदाराला पश्चाताप होणार नाही, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता महिन्यातून एकदा तरी होत असल्याचा अनुभव आर्वी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना येत आहे. बंद झालेल्या दुग्ध व्यवसायानंतर वाढलेल्या तेल गिरण्याही वाकोल्या दाखवू लागल्या. दरम्यान, कापूस उत्पादक शेतकरी, तेलगिरणी मालकांना फायद्याचा ठरणारा ढेप वायदे बाजार (एन. सी. डी. इ. एस. स्टॉक एसचेंज) आर्वीत सुरू होणार आहे. हा प्रकल्प देशात तिरसा आणि राज्यात दुसरा ठरणार आहे.
आर्वी Sumit Wankhede परिसर कापसाची मोठी बाजारपेठ आहे. या भागातील शेतकर्याचे प्रमुख पीक कापूस आहे. मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन या भागात होत असल्यामुळे जिनींग, प्रेसिंग, ऑइल मिल उद्योगाला चालना मिळाली. यातून निर्माण होणारी सरकी व ढेप यांना बाजारपेठ मिळावी याकरिता जिनिंग, प्रेसिंग व ऑइल मिल संघटनेच्या वतीने एन. सी.डी. ई.एस. स्टॉक एसचेंजमध्ये सरकी ढेप डिलिव्हरी सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा आ. सुमित वानखेडे यांनी पाठपुरावा केल्यामुळे स्टॉक एसचेंजमध्ये सरकी ढेप डिलिव्हरी सेंटर सुरू करून या आर्वी सारख्या शहराला प्लॅटफॉर्म ऊपलब्ध करून दिला. या सेंटरमुळे आर्वी परिसरामध्ये असलेल्या जिनिंग प्रेसिंग व ऑइल उद्योगातील व्यापार्यांना आपली सरकी व ढेप विकताना ज्या अनेक अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होऊन आपला माल येथेच सहज विकता येईल. सरकी व ढेपेला बाजारपेठ मिळाली असल्यामुळे या परिसरातील उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होईल.
देशात गुजरात मधील कडी आणि महाराष्ट्र अकोला हे दोनच डिलिव्हरी सेंटर होते. आता आर्वी येथे राज्यातील दुसरा प्रकल्प सुरू होणार असल्याने पूर्व विदर्भासह यवतमाळ व अमरावती येथीलही शेतकरी व तेल गिरणी मालकांना त्याचा फायदा होणार आहे.
रोजगार निर्मितीचे एक पाऊल : आ. वानखेडे
आर्वीत पुर्वी दुधाचा व्यवसाय होता. नैसर्गिक आपत्तीने तो व्यवसाय बंद पडला. त्यानंतर आर्वी परिसरात असलेल्या ७० टके तेल गिरण्याही बंद पडल्या. ज्या तेल गिरण्या सुरू आहेत त्यांना अकोला येथे ढेप पाठवावी लागत होती. काही उद्योजक हरयाणा किंवा पंजाबमध्ये सुद्धा ढेप पाठवतात. त्यामुळे रोजगारही हिरावल्या गेला होता. आता बंद पडलेल्या तेल गिरण्या पुन्हा सुरू होतील आणि इथली ढेप इथेच विकल्या जाईल. ढेप वायदे बाजारात ऑन लाईन विक्री करता येणार असल्याने ढेपीचे भावही आधीच कळणार आहेत. या निमित्ताने वेअर हाऊसचीही निर्मिती होईल, अशी माहिती आ. वानखेडे यांनी दिली.