मोठी बातमी! नेपाळमधून निलेश चव्हाण अटकेत

वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

    दिनांक :30-May-2025
Total Views |
पुणे,
Nilesh Chavan arrested वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक केली आहे. वैष्णवीच्या बाळाला घेऊन गेलेल्या कुटुंबाला धमकावणे, बंदूक दाखवणे आणि बाळाची हेळसांड केल्याच्या गंभीर आरोपांखाली निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता.
 

Vaishnavi Hagawane case Nilesh Chavan arrested 
पोलिसांनी Nilesh Chavan arrested  दिलेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाचा जवळचा व्यक्ती असून तो करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या चौकशीत त्याचं नाव समोर आलं. विशेष म्हणजे, वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे होतं. बाळ परत आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला त्याने बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात त्याच्यावर स्टँडिंग वारंट काढण्यात आलं होतं. त्याचा शोध घेण्यासाठी प्रारंभी तीन पथकं तयार करण्यात आली होती, मात्र नंतर हे पथक वाढवून सहा पोलिस पथकं सक्रिय करण्यात आली. अखेर, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जाऊन त्याला ताब्यात घेतलं. सध्या त्याची अधिक चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
कुटुंबातील इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत
 
 
दरम्यान, या प्रकरणात वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. तर दीर सुशील हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे हे पोलीस कोठडीत असून, त्यांच्या कोठडीत 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.