हुतात्मा मधुकर चौधरी यांचे नाव तंत्र शिक्षण विद्यालयास

महाराष्ट्र सरकारकडून गौरवपूर्ण निर्णय

    दिनांक :30-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
Madhukar Chaudhary : गोवा मुक्ती संग्रामात पोर्तुगीज सत्तेविरुद्ध जिवाची बाजी लावून शौर्यपूर्ण प्राणार्पण करणारे हुतात्मा मधुकर चौधरी यांचे नाव आता उमरखेड येथील तंत्र शिक्षण विद्यालयास देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
 
 
JK
 
गोवा सरहद्दीवर चालू असलेल्या संघर्षात, परकीय पत्रकारांनीही मधुकर चौधरी यांच्या शौर्य आणि बलिदानाचे भावपूर्ण वर्णन केले आहे. त्यांचे मरण हे महाभारतातील वीर अभिमन्यूच्या शौर्याला साजेसे होते, अशी भावना विदर्भ टिळक, लोकनायक बापूजी अणे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली होती.
 
 
अशा थोर देशभक्ताच्या नावाने येथील तंत्र शिक्षण विद्यालय या संस्थेचे नामकरण होणे हे उमरखेडसारख्या ठिकाणासाठी गौरवाचे आणि प्रेरणदायी आहे.