हाऊसफुल ५’वर सेन्सॉर बोर्डाची कात्री

पाच सीन हटवले, अनेक शब्दही बदलले!

    दिनांक :31-May-2025
Total Views |
मुंबई,
Housefull 5 अक्षय कुमारचा बहुचर्चित कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असला, तरी त्याआधीच सेन्सॉर बोर्डाने (CBFC) त्यावर कात्री चालवली आहे. चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद वादग्रस्त ठरल्याने बोर्डाने त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. त्यामुळे हा चित्रपट आता कपातीनंतर U/A १६+ प्रमाणपत्रासह प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
Housefull 5 Censor Cuts
कापले गेलेले सीन आणि बदललेले संवाद :
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ‘हाऊसफुल ५’ मधील एकूण पाच सीन कापण्यात आले असून काही शब्द व संवादही सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार बदलण्यात आले आहेत.
स्टारकास्ट आणि टीम :
 
 
या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, चित्रांगदा सिंग, चंकी पांडे, नाना पाटेकर, फरदीन खान, दिनो मोरिया, जॅकी श्रॉफ, सौंदर्या शर्मा, सोनम बाजवा, निकितिन धीर आणि जॉन यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ‘हाऊसफुल ५’ ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.
 
 
U/A १६+ प्रमाणपत्र म्हणजे काय?
 
 
CBFC ने ‘हाऊसफुल ५’ ला U/A १६+ प्रमाणपत्र दिले आहे. म्हणजेच सर्व वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात, पण १२ वर्षांखालील मुलांनी तो पालकांसोबतच पाहावा, असे सूचित करण्यात आले आहे.सर्व कपातीनंतर ‘हाऊसफुल ५’ आता ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हास्याचे फवारे उडवणारा हा चित्रपट किती धमाल करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.